Electric scooter | देशातील अनेक कंपन्या आणि स्टार्टअप्स इलेक्ट्रिक टू-व्हीलर तयार करत आहेत. विविध नाव आणि डिझाईन असलेल्या या दुचाकींच्या गर्दीतून सर्वोत्तम ई-स्कूटर निवडणे हेही मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत कोणत्या गाडीला सर्वात जास्त डिमांड आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
म्हणजेच कोणती इलेक्ट्रिक टू-व्हीलर लोक सर्वाधिक विकत घेत असतील? याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. 2022 च्या पहिल्या 6 महिन्यांत म्हणजेच जानेवारी ते जून या कालावधीत कोणत्या कंपनीच्या दुचाकी सर्वाधिक विकल्या गेल्या याची यादीच समोर आली आहे.
या यादीच्या मदतीने तुम्ही स्वतःसाठी सर्वोत्तम ई-स्कूटर निवडण्यास सक्षम असाल. या यादीतील टॉप-10 कंपन्या ओकिनावा, हिरो इलेक्ट्रिक, ओला, अँपिअर, एथर, प्युअर ईव्ही, टीव्हीएस, रिव्हॉल्ट, बजाज आणि बेनलिंग आहेत. सर्वात वर आणि तळाशी कोण आहे, जाणून घेऊया.
ओकिनावासमोर अपयशी ठरल्या सर्व कंपन्या
2022 च्या पहिल्या 6 महिन्यांचा डेटा पाहता, असे समोर आले आहे की, इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपन्या ओकिनावासमोर अपयशी ठरल्या आहेत. ओकिनावाने या कालावधीत 47,121 ई-वाहने विकली आणि त्यांचा बाजारातील हिस्सा 19.58% होता.
इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये एकेकाळी नंबर वन असलेली हीरो इलेक्ट्रिक या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी 44,084 वाहने विकली आणि त्यांचा बाजार हिस्सा 18.31% इतका होता. यानंतर ओला इलेक्ट्रिकचा क्रमांक येतो. या कालावधीत ओलाने 17.45% मार्केट शेअरसह 41,994 ई-स्कूटर विकल्या.
टॉप-5 मध्ये आणखी दोन कंपन्या अँपिअर आणि एथर एनर्जी आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे प्युअर ईव्हीचा टॉप-५ मध्ये समावेश नाही. ई-स्कूटरला आग लागल्याचा फटका प्युअर ईव्हीला बसला आहे. वाहन (VAHAN) डेटानुसार, ओकिनावामध्ये सर्वाधिक 6976 ई-स्कूटर्सची नोंदणी गेल्या महिन्यात झाली होती.
अँपिअर 6534 युनिट्सच्या नोंदणीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. हिरो इलेक्ट्रिक 6484 युनिटच्या नोंदणीसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच वेळी, ओला इलेक्ट्रिक 5869 ई-स्कूटर नोंदणीसह चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. ऍथर एनर्जी पाचव्या क्रमांकावर होती. त्यांच्या 3797 ई-स्कूटर्सची नोंदणी झाली.
ओला इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री कमी होण्याचे एक कारण म्हणजे इलेक्ट्रिक टू-व्हीलरला आग लागणे. गेल्या काही दिवसांत ईव्हीला आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. ओला ई-स्कूटरमध्ये अशी प्रकरणं समोर आली नाहीत, परंतु त्यात इतर समस्या दिसून आल्या आहेत.
ट्यूब आणि चाकाला हँडलबारला जोडणाऱ्या फ्रंट सस्पेंशनचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत ज्यामध्ये सस्पेंशन तुटलेले दिसत आहे. त्याच वेळी, सॉफ्टवेअरमध्ये खराबी झाल्याने ओला स्कुटर आपोआपच रिव्हर्स गिअरला गेल्याचेही दिसून आले. त्यानंतर एका व्यक्तीच्या डोक्याला 16 टाके पडले होते.
महत्वाच्या बातम्या
शेवटची चाल शिंदे गटाला महागात पडणार? ‘ती’ चूक शिवसेनेने हेरली, सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका
‘बारामतीकरांचं राज्य संपलय आता तरी नीट वागा’; शिंदेंनी थेट शरद पवारांनाच सुनावले
हृदय पिळवटून टाकणारी घटना; लटकलेल्या वायरचा बैलाला शाॅक अन् मालकासहीत सगळेच ठार
Aamir Khan’s daughter: आमिर खानची लाडली काही थांबेना, आता ब्रालेस होऊन बॉयफ्रेंडला घेऊन पोहोचली अशा ठिकाणी