Share

…यामुळे अक्षय खन्ना आणि करिश्मा कपूरचं लग्न झालं नाही; अभिनेता आजही आहे अविवाहित

बॉलीवूड अभिनेता विनोद खन्ना यांचा मुलगा म्हणजेच अक्षय खन्नाने १९९७ मध्ये ‘हिमालय पुत्र’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. हा चित्रपट तितकासा चालला नाही, मात्र अक्षयच्या अभिनयाने लोकांची मनं जिंकली. मात्र अक्षय खन्नाला खरी ओळख मिळाली ती ‘बॉर्डर’ चित्रपटातील धर्मवीरच्या व्यक्तिरेखेतून.

तसेच, ‘दिल चाहता है’, ‘रेस’ सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये देखील त्याने काम केले. अक्षय खन्ना सध्या मात्र चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. अक्षय नेहमीच त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत असायचा. त्यात अभिनेत्यानं आजपर्यंत लग्न केलेलं नाही. पण का? हा असा एक प्रश्न आहे ज्याचं उत्तर अद्याप कोणाला मिळालेलं नाही.

अक्षय खन्ना शेवटचा ‘सेक्शन ३७५’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री ऋचा चढ्ढा सुद्धा मुख्य भूमिकेत होती. ‘हिमालय पुत्र’ या त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

माहितीनुसार, अक्षय खन्नाचं लग्न अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत होणार होतं. पण हे लग्न होऊ शकलं नाही. रणधीर कपूर यांनी त्यांची मुलगी करिश्माचं लग्न विनोद खन्ना यांचा मुलगा अक्षय खन्नासोबत ठरवलं होतं.

पण करिश्माची आई बबिता कपूर यांना मात्र हे लग्न मान्य नव्हतं. करिश्माच्या करिअरवर कोणत्याही प्रकारचं बंधन येऊ नये असं बबिता यांना वाटत होतं. त्यामुळे अक्षय आणि करिश्माचं लग्न होऊ शकलं नाही. त्यानंतर करिश्मानं बिझनेसमन संजय कपूरशी लग्न केलं पण अक्षय मात्र अद्याप अविवाहितच आहे.

अक्षय खन्नाचे करिश्मा व्यतिरिक्त अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्याशी देखील नाव जोडलं गेलं होतं. दोघांनी ‘आ अब लौट चले’ या चित्रपटात एकत्र काम केले होते आणि त्यानंतर ते दोघे रिलेशनशिपमध्ये आले असे बोलले जात होते. एका मुलाखतीत देखील अक्षयने स्वतः ‘तो ऐश्वर्या च्या चेहऱ्याकडे पाहत राहायचा’ हे कबूल केलं होतं.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now