Share

Rohit Sharma: ‘हा’ धडाकेबाज गोलंदाज रोहितला भासून देणार नाही बुमराहची उणीव, पाकिस्तानला पडणार तोंडघशी

Jasprit Bumrah- Rohit Sharma

Asia Cup, Jasprit Bumrah, Rohit Sharma, Bhuvneshwar Kumar/ जेव्हा-जेव्हा भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात क्रिकेट सामना होतो तेव्हा उत्कंठा शिगेला पोहोचते. 28 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकाचा सामना रंगणार आहे. सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. आशिया चषकापूर्वीच भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह जखमी झाला होता. याच कारणामुळे त्याला आशिया कपमध्ये स्थान मिळालेले नाही.

मात्र भारतीय संघात एक स्टार खेळाडू आहे, जो बुमराहची कमतरता भरून काढू शकतो. हा खेळाडू किलर बॉलिंगमध्ये निपुण आहे. भुवनेश्वर कुमारचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. भुवनेश्वर कुमार डावाच्या सुरुवातीला अत्यंत धोकादायक गोलंदाजी करतो आणि विकेट घेतो. ते देखील बरेच किफायतशीर असल्याचे सिद्ध होते.

भुवनेश्वर कुमारने स्विंगमध्ये प्रभुत्व मिळवले आहे. त्याच्याकडे अफाट अनुभव आहे, जो टीम इंडियासाठी उपयुक्त ठरू शकतो. भुवी जेव्हा आपल्या लयीत असतो तेव्हा तो फलंदाजीच्या कोणत्याही आक्रमणाला तोंडघशी पाडू शकतो. भुवनेश्वरच्या बॉलिंगचे फॅन आपल्याला पाहायला मिळतात. तसेच तो आपल्या चाहत्यांना नाराज करत नाही.

गेल्या वर्षीच्या T20 विश्वचषकापासून भुवनेश्वर कुमारने एकदिवसीय आणि कसोटी आणि टी-20 क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. टी-20 क्रिकेटमध्ये तो भारतासाठी मोठा सामना विजेता आहे. त्याची चार षटके पराभव आणि विजयातील फरक ठरवतात. पाकिस्तानविरुद्ध शानदार कामगिरी करण्यासाठी तो उत्सुक असेल. भुवनेश्वर संथ गतीच्या चेंडूंवर झटपट विकेट घेतो.

भुवनेश्वर कुमारने भारतीय संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. तो भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आहे. भुवनेश्वर कुमारने भारताकडून 21 कसोटी सामन्यात 63, 121 एकदिवसीय सामन्यात 141 आणि 72 टी-20 सामन्यात 73 बळी घेतले आहेत. अवघ्या काही चेंडूंमध्ये सामन्याचा मार्ग बदलण्यासाठी तो प्रसिद्ध आहे.

अलीकडच्या काळात भारतीय गोलंदाजी खूप मजबूत झाली आहे. या गोलंदाजांच्या जोरावरच भारताने परदेशात विजयाचे झेंडे रोवले आहेत. भुवनेश्वर कुमारची गणना भारताच्या सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये केली जाते. भुवनेश्वरशिवाय भारतीय संघात अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांना स्थान मिळाले आहे.

महत्वाच्या बातम्या-
Shatrughan Sinha: ‘या’ अभिनेत्रीच होणार होत शत्रुघ्न सिन्हासोबत लग्न; पण तिने केल पाकिस्तानी क्रिकेटरसोबत लग्न
स्वातंत्र्यदिनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ स्टेटस ठेवणाऱ्या शिक्षकाला ठोकल्या बेड्या; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
J.P. Nadda: पाकिस्तान काँग्रेसच्या मदतीने भारतावर हल्ले करत होता, भाजपचा खळबळजनक आरोप

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now