श्रीलंकेत अन्नधान्याच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या परिस्थितीने श्रीलंकेत हाहाकार माजला आहे. शुक्रवारी संतप्त नागरिकांनी थेट राष्ट्रपती भवनाकडे आपला मोर्चा वळवला. नागरिकांनी राष्ट्रपती भवनात प्रवेश करत असताना पोलिसांनी त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु आंदोलक आतमध्ये शिरले. (‘This’ country is in dire straits due to starvation, protesters attack Rashtrapati Bhavan)
श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी संतप्त नागरिकांचा रोष पाहून त्या ठिकाणाहून पळ काढला. राष्ट्रपती नक्की विमानातून गेले की समुद्रीमार्गे? हे समजू शकले नाही. ते कुठे आहेत? याची सुद्धा अद्याप माहिती नाही. परंतु राष्ट्रपतींना सुरक्षित ठिकाणी पोहोचविले आहे, अशी माहिती श्रीलंकेच्या संरक्षण दलाकडून वृत्त माध्यमांना देण्यात आली आहे.
देशातील या भयानक परिस्थितीमुळे सर्व विरोधकांनी एकत्रित येऊन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांच्याकडून राष्ट्रपतींच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.
मागील काही दिवसांपासून महागाईने, उपासमारीने त्रस्त सामान्य माणसांकडून वारंवार आंदोलने केली जात आहे. यावेळी पण संतापलेल्या नागरिकांनी प्रचंड मोठ्या संख्येने कोलंबोमध्ये निदर्शन केले आणि थेट राष्ट्रपती भवनात प्रवेश केला. तेव्हा पोलिसांकडून जमावाला रोखण्याचा खूप प्रयत्न झाला.
जमावाला हटवण्यासाठी पाण्याच्या तोफगोळ्या, अश्रुधूराच्या नळकांड्या यांचा वापर पोलिसांनी केला. परंतु जमावावर पोलिसांना नियंत्रण मिळवता आले नाही. प्रतिकूल परिस्थिती बघताच राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे राष्ट्रपती भवनातून पसार झाले. ते पळून गेल्याची जगभरात जोरदार चर्चा आहे.
देश प्रचंड कर्जबाजारी झाल्यामुळे अन्नधान्याच्या, रोज वापरातील वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. श्रीलंकेत सामान्य नागरिकांना रोज अन्नधान्याची गरज भागवणेही अशक्य झाल्याने देशात उपासमार वाढली आहे. अशावेळी संतप्त नागरिक रस्त्यावर उतरून सरकार विरोधात आंदोलने करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
भाजप आमदाराच्या घरासमोर सापडलं मोठं घबाड; वाचा नेमकं प्रकरण
जपानच्या शिंजो आबेंची हत्या आणि अग्निपथ योजना, काय आहे दोघांमधील कनेक्शन? वाचून तुम्हीही हादराल
मला आपल्याशी बोलायचंय.., उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या एकमेव अपक्ष माजी मंत्र्याने दिले आमंत्रण