Share

आघाडीत बिघाडी! मुख्यमंत्र्यांविरोधात काँगेस नेत्याची थेट सुप्रीम कोर्टात धाव; अंतर्गत वाद चव्हाट्यावर

udhav thackeray

तीन वेगळ्या पक्षानी मिळून स्थापन झालेले महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत आहे. यातीलच एक मुद्दा म्हणजे ठाकरे सरकारमधील नाराजीनाट्य. एकाच सरकारमध्ये काम करत असले तरी अनेक नेते पक्षाला घरचा आहेर देत आहेत, तर अनेक नेते हे आपल्याच सरकारमधील पक्षावर टीका करत आहेत.

हे सांगण्याचे कारण म्हणजे आता एक असं प्रकरण समोर आले आहे की, मुख्यमंत्र्यांविरोधात कॉंग्रेस नेत्याने थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, पुन्हा एकदा महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

वाचा नेमकं प्रकरण काय? राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि चांदिवली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्याविरोधात काॅग्रेस नेत्याने थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या कॉंग्रेसच्या आमदाराने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत.

मुख्यमंत्र्यांविरोधात सुप्रीम कोर्टात जाणाऱ्या कॉंग्रेस नेत्याचे नाव आमदार नसीम खान असे आहे. नसीम खान हे काँग्रेसचे माजी मंत्री असून आमदार आहेत. मागील निवडणुकीत प्रचार संपला. प्रचार संपल्यानंतरही मुख्यमंत्री ठाकरे आणि शिवसेना नेते आपल्या मतदारसंघात आले होते, असा गंभीर आरोप नसीम खान यांनी केला.

या प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री, आमदार नसीम खान यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि चांदिवली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका फेटाळण्यात आली. आता नसीम खान यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

दरम्यान, वाचा नसीम खान यांनी काय आरोप केले? प्रचार संपल्यानंतर ही मुख्यमंत्री ठाकरे माझ्या मतदार संघात आले. यासंदर्भात ही तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती नसीम खान यांनी दिली आहे. या प्रकरणावर अजून कोंग्रेसच्या बड्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या नाहीये, मात्र राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
नाद केला भावा तू! परदेशातील नोकरीला लाथ मारून मायदेशी फुलवली शेती, आज लाखोंची उलाढाल
सत्तेचा माज! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराप्रकरणी काँग्रेस आमदार पुत्रावर गुन्हा दाखल, आमदार म्हणतो…
शिवसेना नेत्याने मातोश्रीला दिलेल्या २ कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणाले, मातोश्री म्हणजे माझी आई
मला खासदार करण्यात शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याचा सिंहाचा वाटा, इम्तियाज जलील यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now