Share

‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १ लाखाचे झाले २८ कोटी

शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स चांगले रिटर्न्स देत आहेत, त्यामुळे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचं प्रमाण देखील वाढत आहे. या आठवड्यात देखील एका कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न दिले आहेत. तुम्ही देखील या कंपनीत गुंतवणूक करून मालामाल होऊ शकता.

या आठवड्यात ज्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न दिला आहे, ती कंपनी म्हणजे नॉन बँकिंग फायनान्स कंपनी होय. ज्यांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे, ते मालामाल झाले आहेत. अरमान फायनॅन्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या एक शेअरची किंमत ४८ पैशांवरून १३०० रुपयांपर्यंत वाढली आहे.

अवघ्या काही वर्षांत अरमान फायनॅन्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या शेअर्सची गुंतवणूकदारांना २००००० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. अरमान फायनॅन्शियल सर्व्हिसेसची मार्केट कॅप ११४७ कोटी रुपये आहे. या कंपनीचा शेअर्स मागील ५२ आठवड्यांमध्ये हाय लेव्हलवर होता.

फायनॅन्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा मागील ५२ आठवड्यामध्ये जास्तीत जास्त १३८७.७५ रुपये या पातळीवर शेअर्स पोहोचला होता. तर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांतील लो लेव्हल ६०३.९५ रुपये आहे.

देशातील अनेक NBFC कंपन्यांपैकी एक अशी कंपनी अरमान फायनॅन्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे शेअर्स ११ मार्च २००४ रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) ४८ पैशांच्या पातळीवर होते ते १८जुलै २०२२ रोजी बीएसईवर १३५०.७५ रुपयांच्या स्तरावर बंद झाले.

त्यामुळे जर, एखाद्या गुंतवणुकदाराने ११ मार्च २००४ रोजी अरमान फायनॅन्शिअल सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असते आणि ती गुंतवणूक आजपर्यंत ठेवली असती, तर आज त्याचे एक लाख रुपये तब्बल २८.१४ कोटी रुपये झाले असते.

 

आर्थिक

Join WhatsApp

Join Now