लोकांना वेगवेगळ्या कार खरेदी करण्याचा आणि त्या चालवण्याचा खूप शौक असतो. त्यामुळे ग्राहकांच्या डिमांड नुसार एकापेक्षा एक भन्नाट गाड्या आपल्याला मार्केट मध्ये पाहायला मिळतात. आता अशाच एका गाडीची आम्ही तुम्हांला माहिती सांगणार आहोत , जी जगातील सर्वांत छोटी कार म्ह्णून ओळखली जात आहे. एवढेच नाही तर कारचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले आहे.
या कारच्या मालकाचे नाव ऐलेक्स ऑर्चिन आहे. ऐलेक्सची उंची जवळपास 6 फुट आहे. त्यामुळे तो या छोट्या कारमध्ये कसा बसतो व कसा उतरतो हे पाहून लोक दंग राहतात. जास्तीत जास्त लोक त्यांच्या या कारची मजाक उडवतात. मात्र कारचा मालक या लहान कार सोबत खुश आहे,कारण कारचे मायलेज चांगले आहे.
या कारचे नाव peel p50 आहे. कारच्या मालकाच्या म्हणण्यानुसार, कारची साइज पाहून लोक मजाक उडवतात. परंतु, यात पेट्रोलचा खर्च बाकीच्या कारच्या तुलनेत खूपच कमी आहे. ती एका लीटर पेट्रोल मध्ये या 42 किमी पर्यंत धावते. यामुळे त्याला ही गोष्ट प्रचंड आवडते, लोकांच्या मजाककडे तो लक्ष देत नाही.
ही केवळ 134 सेंटीमीटर लांब, 98 सेंटीमीटर रुंद आहे. तर याची हाइट फक्त 100 सेंटीमीटर आहे. ही कार 4.5 हॉर्सपॉवरच्या इंजिन सोबत येते. पीएल इंजिनियरिंग नावाची कंपनी या कारला बनवते. आधी या कारला 1962 ते 1965 दरम्यान बनवले गेले होते. नंतर याचे 2010 पासून प्रोडक्शन बनवणे पुन्हा सुरू केले.
2010 मध्ये या कारला जगातील सर्वांत छोटी कार म्हणून घोषीत करण्यात आले आहे. या कारचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. या कारची साइज छोटी जरी असली तरी याची किंमत काही कमी नाही. याचा वेग 37 किलोमीटर प्रती तास आहे. या कारची किंमत 84 लाख रुपयांहून अधिक आहे.
तर दुसरीकडे जगातील सर्वात लांब कार म्ह्णून अमेरिकेतील ‘ड्रीम’ कार ओळखली जाते. ती 30.54 मीटर म्हणजेच 100 फुटांपेक्षा जास्त लांब आहे. या कारची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. ही कार 1986 मध्ये बनवण्यात आली होती. कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या Jay Ohrberg नावाच्या व्यक्तीने ही कार बनवली आहे.