काही वर्षांपूर्वी अभिनेता मिलिंद सोमनने बिचवर धावतानाचे त्याचे न्यूड फोटो शूट केले होते. त्याचे फोटो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण आतापर्यत अभिनेत्रींने न्यूड फोटो शूट केल्याच्या घटना ऐकल्या होत्या. मात्र, अभिनेत्याने न्यूड फोटो शूट केल्याचे पहिल्यांदा पाहिले होते.
आता मिलिंद सोमननंतर आणखी एका अभिनेत्याने बोल्ड फोटो शूट केले आहेत. हे फोटोशूट पाहून सर्वच चकीत झाले आहेत. त्याच्या फोटोवर बॉलिवूड अभिनेत्रींनी देखील कमेन्ट केल्या आहेत. हा बोल्ड फोटो शूट करणारा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून राहुल खन्ना आहे.
त्याचे फोटो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच त्याचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. राहुल खन्नाने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. त्याच्या या फोटोला अनेकांनी लाईक करत आपल्या कमेंन्ट दिल्या आहेत.
या फोटोमध्ये त्याने अंगावर कपडे घातलेले नाही आहेत. तो निळ्या सोफ्यावर आरामात बसलेला दिसत आहे.त्याने आपला प्रायव्हेट पार्ट उशीने झाकलाय. तर पायात शूज आणि मोजे नक्कीच घातले आहेत. हा फोटो पाहून सर्वंच शॉक झाले आहेत.
फोटोच्या कॅप्शनमध्य़े राहूलने लिहिले आहे की, मी लपवून ठेवत आहे असे काहीतरी आहे, पण आता ती शेअर करण्याची वेळ आली आहे!, या पोस्टनंतर राहुल खन्ना उद्या म्हणजेच सोमवारी काहीतरी मोठा खुलासा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राहुल खन्ना बद्दल अधिक माहिती म्हणजे, राहुल हा प्रसिद्ध अभिनेता विनोद खन्ना यांचा मोठा मुलगा आहे. त्यांचा जन्म मुंबईत झाला. राहुल खन्ना यांनी त्यांचे वडील आणि भावाप्रमाणे चित्रपटांमध्ये नशीब आजमावले. पण राहुलला भाऊ आणि वडिलांप्रमाणे चित्रपटसृष्टीत यश मिळवता आले नाही. त्यामुळे तो मॉडेलिंगकडे वळला होता.