Share

बॉलीवूडमधील ‘या’ अभिनेत्यामुळे अभिषेक-ऐश्वर्या आले जवळ; नाव वाचून तुम्हालाही बसणार नाही विश्वास

अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय जोडपे आहेत. दोघांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली आहे. खर तर अभिषेक आणि ऐश्वर्याची प्रेमकहाणी चित्रपटापेक्षा कमी नाही. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतरही दोघांची चांगलीच बाँडिंग आहे. तसेच फार कमी लोकांना माहित असेल की ऐश्वर्या आणि अभिषेकची पहिली भेट ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा मुलगा बॉबी देओलने करून दिली होती. याचा खुलासा खुद्द अभिषेक बच्चनने एका मुलाखतीदरम्यान केला आहे.(This Bollywood actor brought Abhishek-Aishwarya closer)

अभिषेक बच्चनने सांगितले की, ऐश्वर्या रायसोबत त्याची पहिली भेट स्वित्झर्लंडमध्ये झाली होती. त्यावेळी ऐश्वर्या तिथे ‘और प्यार हो गया’ या चित्रपटाचे शूटिंग करत होती, ज्यामध्ये तिच्यासोबत बॉबी देओल काम करत होता. त्याचवेळी शुटिंगचे लोकेशन पाहण्यासाठी अभिषेक बच्चनही स्वित्झर्लंडमध्ये उपस्थित होता.

Abhishek Bachchan reveals Bobby Deol played Cupid in his love story with  Aishwarya Rai - Movies News

काही काळापूर्वी, यूट्यूबर रणवीर इलाहबदियाशी झालेल्या संभाषणात अभिषेकने ऐश्वर्या रायसोबतच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले होते. तो म्हणाला, ऐश्वर्यासोबत माझी पहिली भेट मी प्रॉडक्शन बॉय असताना झाली होती. माझे वडील (अमिताभ बच्चन) ‘मृत्युदाता’ नावाचा चित्रपट शूट करत होते. चित्रपटाचे लोकेशन पाहण्यासाठी मी स्वित्झर्लंडला गेलो होतो. कंपनीला वाटले की मी तिथे मोठा झालो आहे आणि बोर्डिंग स्कूलमध्ये शिकलो आहे, त्यामुळे मी त्यांना चांगली ठिकाणे सांगू शकेन.

अभिषेक पुढे म्हणाला, मी काही दिवसांसाठी तिथे गेलो होतो. माझा बालपणीचा मित्र बॉबी देओल त्याच्या पहिल्या चित्रपटाचे ‘और प्यार हो गया’चे शूटिंग करत होता. मी पण तिथे असल्याचं कळल्यावर त्याने मला जेवायला बोलावलं. मी पहिल्यांदाच बॉबी आणि ऐश्वर्याला शूटिंग करताना पाहिलं आणि मी ऐश्वर्याला भेटलो.

Bobby Deol Revealed The Turning Point Of His Life, Said - Because Of This,  The Whole Life Changed | Bobby Deol ने अपनी लाइफ के टर्निंग प्वाइंट का किया  खुलासा, बोले- इस

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन 20 एप्रिल 2007 रोजी विवाहबद्ध झाले आहे. 2006 मध्ये ‘उमराव जान’च्या शूटिंगदरम्यान दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. यानंतर 2006 मध्ये ‘गुरू’ चित्रपटाच्या प्रीमियरनंतर अभिषेकने न्यूयॉर्कमध्ये ऐश्वर्याला लग्नासाठी प्रपोज केले. दोघांना एक मुलगी देखील आहे, तिचे नाव आराध्या बच्चन आहे.

अभिषेक बच्चनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तो त्याचा नवीन चित्रपट ‘दासवी’मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 7 एप्रिल 2022 रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अभिषेकसोबत यामी गौतम आणि निम्रत कौर या स्टार्स दिसणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-
मी तुमच्या बायकोवर बोलत नाही, तुम्ही माझ्या नवऱ्याला मध्ये का आणता? चित्रा वाघ कडाडल्या 
श्रीलंकेच्या पंतप्रधानांच्या सुनेनं कुटुंबियांसोबत सोडला देश, श्रीलंका आता वाऱ्यावर, लोकं संतापले
औरंगाबादेत इंजिनियर तरुणाने केला भयावह शेवट, सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा
वक्फ बोर्डाच्या जमिनींवर चालवणार बुलडोझर, मदरशांबाबतही केले मोठे वक्तव्य, योगींच्या मंत्र्याची मोठी घोषणा

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now