बॉलिवूडची दिग्गज अदाकारा अभिनेत्री रेखा (Rekha) यांचे प्रचंड चाहते आपल्याला पाहायला मिळतात. त्या दशकाची गोष्ट असो किंवा 2022 साल, रेखाच्या स्टाईलने प्रभावित होणार नाही अशी क्वचितच कोणी व्यक्ती असेल. 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेली रेखा हिंदी चित्रपटसृष्टीत दीर्घकाळापासून सक्रिय आहे, मात्र तिच्याशी संबंधित एक भयानक घटना समोर आली आहे, जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल.(This actor had forcibly kissed Rekha for 5 minutes)
ही गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा ती 1969 मध्ये ‘अंजाना सफर’ (Anjana Safar) या सिनेमाचे शूटिंग करत होती. मिळालेल्या माहितीनुसार, रेखासोबत ही घटना घडली जेव्हा ती बंगाली अभिनेता बिस्वजीत चॅटर्जीसोबत (Biswajeet Chatterjee) ‘अंजाना सफर’चे शूटिंग करत होती. त्यावेळी रेखाचे वय सुमारे 15 वर्षे होते, जेव्हा तिच्या सहकलाकाराने बळजबरीने तिचे चुंबन घेऊन तिचा विनयभंग केला.
चित्रपटाचे दिग्दर्शक राजा नवाथे (Raja Nawathe) यांनी ‘अॅक्शन’ म्हटल्यावर हा प्रकार घडला. अॅक्शन’ म्हटल्याबरोबर विश्वजित रेखाचे चुंबन घेऊ लागला आणि 5 मिनिटे असेच करत राहिला. रेखाच्या गालावरून अश्रू ओघळत असताना चित्रपटातील कर्मचारी कॅमेऱ्याच्या मागे आनंदाने शिट्टी वाजवत होते.
यासीर उस्मान यांनी लिहिलेल्या ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’ (Rekha: The Untold Story) या चरित्रात रेखाने या भयानक घटनेचा उल्लेख केला आहे. पुस्तकातील एक उताऱ्यामध्ये सांगितले आहे की, “अंजाना सफर” चे शूटिंग बॉम्बेतील मेहबूब स्टुडिओमध्ये होत होते. राजा नवाथे या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि छायाचित्रकार होते.
चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलमध्ये, कुलजीत पाल (दिग्दर्शक), राजा आणि विश्वजित (मुख्य अभिनेता) यांनी नियोजन केले. त्या दिवशी रेखा आणि विश्वजित यांच्यात एक रोमँटिक सीन शूट होणार होता. शूटिंगपूर्वी सर्व तपशील फायनल करण्यात आले होते. या घटनेचे वर्णन करताना पुस्तकात पुढे लिहिले आहे की, ‘राजा नवाथे यांनी ‘अॅक्शन’ म्हणताच विश्वजितने रेखाला आपल्या मिठीत घेतले आणि ओठांवर चुंबन घेण्यास सुरुवात केली.
रेखा स्तब्ध झाली, कारण तिला या चुंबनाबद्दल आधी सांगितले गेले नव्हते. कॅमेरा फिरत राहिला आणि ना दिग्दर्शक ‘कट’ म्हणाला ना विश्वजित तिला सोडत होता. संपूर्ण पाच मिनिटे विश्वजित रेखाचे चुंबन घेत राहिला. युनिटचे सदस्य शिट्ट्या वाजवत ओरडत होते. रेखाचे डोळे घट्ट बंद होते, पण अश्रूंनी गाल ओले झाले होते.
याबाबत विश्वजित म्हणाला होता की, ही त्यांची नसून दिग्दर्शक राजा नवाथे यांची चूक आहे, कारण ही त्यांची कल्पना होती. कथेत हे नको असलेले चुंबन आवश्यक आहे असे दिग्दर्शकाला वाटत असल्याचे त्याला सांगण्यात आले.
महत्वाच्या बातम्या-
आसाराम बापू निर्दोष आहेत त्यांची सुटका करा; महिलादिनी नांदेडमधील महीलांनी काढला मोर्चा
फोटोग्राफरचा एक क्लिक आणि ‘त्या’ मुलीचं संपूर्ण आयुष्यच बदललं, वाचा फुगे विकणाऱ्या किसबूची कहाणी
‘आई कुठे काय करते’ मालिकेत मोठा ट्विस्ट; आशुतोषमुळे अरुंधतीच्या आयुष्यात येणार नवीन वादळ
अभिनेत्री जुई गडकरीला झालाय गंभीर आजार; पोस्ट शेअर करत म्हणाली, हळूहळू शरीरातील अवयव..