Share

Krishna: या अभिनेत्याने १७ वेळा कृष्ण बनून रचला इतिहास, आता तर लोकं देव मानून करतात पूजा

NT Rama Rao

Krishna, Janmashtami, Akshay Kumar, Gemini Ganesan, Khalil/ 19 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी (Janmashtmi 2022) हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड स्टार्सपर्यंत सार्वजन हा सण साजरा करतात. तसेच, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक चित्रपट बनले आहेत जे श्री कृष्णावर आधारित आहेत. अनेक प्रसिद्ध स्टार्सनी पडद्यावर कृष्णाची भूमिका साकारली आहे आणि हे वर्षानुवर्षे सुरू आहे.

श्रीकृष्णाच्या भूमिकेत अनेक सेलिब्रिटी पडद्यावर दिसले असले तरी, 17 चित्रपटांमध्ये भगवान कृष्णाची भूमिका साकारणारा एक स्टार आहे, तो दुसरा कोणी नसून एनटी रामाराव (NT Rama Rao) आहे. एनटीआर, जो दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता होता, तो पहिला असा स्टार आहे, जो 17 वेळा कृष्णाच्या अवतारात दिसला. आज आपण जाणून घेऊ, कोणत्या चित्रपटातील कलाकारांनी श्री कृष्णाची भूमिका साकारली आणि ते प्रसिद्ध झाले…

एनटी रामाराव बद्दल बोलायचे झाले तर त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत जवळपास 300 चित्रपटात काम केले. 17 वेळा श्रीकृष्णाची भूमिका साकारल्यानंतर लोक त्यांना खरा देव मानू लागले. असे म्हणतात की त्यांच्या चित्रपटांमध्ये पौराणिक पात्रे स्थानिक कथांशी जोडलेली होत आणि याच कारणामुळे लोक त्याच्या चित्रपटांशी खूप जोडले गेले. त्यांनी 1950 मध्ये त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यादरम्यान बहुतेक चित्रपट हिंदू देवतांवर बनवले गेले. त्यांनी श्री कृष्णार्जुन युद्धम, दानवीर सूर कर्ण, कर्ण अशा पौराणिक चित्रपटांमध्ये काम केले.

 

अक्षय कुमारनेही एकदा पडद्यावर श्रीकृष्णाची भूमिका साकारली आहे. 2012 मध्ये आलेल्या ‘ओह माय गॉड’ या चित्रपटात त्याने काम केले होते. आता या चित्रपटाचा OMG 2 म्हणून दुसरा भागही बनवला जात असून त्यातही अक्षय मुख्य भूमिकेत आहे.

PAVAN KALYAN

दक्षिणेतील अभिनेता पवन कल्याण याने तेलुगू चित्रपट ‘गोपाला गोपाला’मध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. पवनला या चित्रपटात काम करायचे नव्हते, पण खूप समजावून सांगितल्यानंतर त्याने काम करण्यास होकार दिल्याचे बोलले जात आहे. मात्र, या चित्रपटातील त्यांची भूमिका फार काळ गाजली नाही. हा चित्रपट 2015 मध्ये आला होता.

Gemini Ganesan

किंग ऑफ रोमान्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या दक्षिणेतील प्रसिद्ध स्टार जेमिनी गणेशन यांनीही अनेक वर्षांनी पडद्यावर भगवान कृष्णाची भूमिका साकारली आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, 1948 मध्ये आलेल्या ‘चक्रधारी’ चित्रपटात त्यांनी भगवान कृष्णाची भूमिका साकारली होती. त्याच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी हा चित्रपट लोकांना खूप आवडला.

Khalil

खलील हा असा अभिनेता होता ज्याने मूकपटांमध्ये कृष्ण आणि राम यांच्या भूमिका केल्या होत्या. 1920 मध्ये आलेल्या कृष्णा सुदामा या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा काम केले. तो एक मूक चित्रपट होता. असे म्हटले जाते की त्यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात अनेक परानिक चित्रपटांमध्ये काम केले आणि अनेक हिंदू देवतांची भूमिका केली. त्यांनी सती पार्वती, महासती अनुसूया, रुक्मणी हरण, मालती माधव, सूर्या कुमारी अशा अनेक चित्रपटात काम केले.

महत्वाच्या बातम्या-
टाटाच्या ‘या’ कंपनीने शेअर मार्केटमध्ये घातला धुमाकूळ, राधाकृष्ण दमानींनी सुद्धा केलीय गुंतवणूक 
मेजर पाहून शहीद संदीप उन्नीकृष्णनचे आई-वडील भावुक, अभिनेत्याला मिठी मारत सांगितली आठवण
..तेव्हा बाळासाहेब ठाकरे कृष्णकुंजवर राज ठाकरेंकडे रहायला आले होते; मनसे नेत्याचा गौप्यस्फोट
२६/११ ला शहीद झालेल्या संदीप उन्नीकृष्णन यांची कथा रुपेरी पडद्यावर Major चा ट्रेलर झाला रिलीज

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now