‘स्कॅम 1992 – द हर्षद मेहता स्टोरी’ नंतर, हंसल मेहता ‘स्कॅम 2003 – द तेलगी स्टोरी’ घेऊन परतले आहेत. जी स्टोरी देशाला हादरवून सोडलेल्या स्टॅम्प घोटाळ्यावर आधारित आहे. या सीरीजबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. कलाकार देखील उघड झाले नाहीत, ज्यामुळे स्कॅम 2003 मध्ये तेलगीची भूमिका कोण करणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. (Scam 2003, Abdul Karim Telgi, Stamp Paper Scam, Hansal Mehta, Gagan Dev Riyar)
आता पहिल्यांदाच या सीरिजमध्ये घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगीची भूमिका साकारणारा कलाकार समोर आला आहे. हंसल मेहताने शोचा एक टीझर शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याची ओळख पडद्यावरील तेलगी करण्यात आली आहे. टीझर व्हिडिओमध्ये तेलगीच्या फोटोंचा कोलाज वेगवेगळ्या स्टाइलमध्ये शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओसह हंसलने लिहिले की, तेलगी मिळाले आहे.
स्कॅम 2003 मध्ये तेलगीची भूमिका करणाऱ्या उत्कृष्ट कलाकार म्हणजे गगन देव रियार होय. गगन हा मूळचा थिएटर अभिनेता असून त्याने सुशांत सिंग राजपूतच्या सोन चिडियामध्ये काम केले आहे. याशिवाय गगनने ए सुटेबल बॉयमध्येही भूमिका साकारली होती.
🔊 Telgi has been found.🗣️
Presenting the incredibly gifted Gagan Dev Riar as Telgi in #Scam2003. See you soon! pic.twitter.com/m7hXhROFX6
— Hansal Mehta (@mehtahansal) May 24, 2022
Scam 2003 ची निर्मिती Applause Entertainment द्वारे केली आहे आणि ही वेब सिरीज Sony Liv वर प्रसारित केली जाईल. हंसल मेहताची मागील सीरीज स्कॅम 1992 च्या यशानंतर आता प्रेक्षक या सिरीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. हंसल हा स्कॅम 2003 चा शो-रनर आहे, तर तुषार हिरानंदानी यांनी दिग्दर्शन केले आहे. शोचे कास्टिंग मुकेश छाबरा यांनी केले आहे.
स्कॅम 2003 सीरीज पत्रकार संजय सिंग यांच्या ‘रिपोर्टर्स डायरी’ या पुस्तकावर आधारित आहे. संजय सिंह यांनी त्या काळात या घोटाळ्याची मोठी कहाणी फोडली. या मालिकेत अब्दुल करीम तेलगीचा जीवनपट दाखवण्यात येणार आहे. या सीरीजची निर्माता कंपनी अॅपलॉज एंटरटेनमेंटने गेल्या वर्षी मार्चमध्ये याची घोषणा केली होती. त्यानंतर या सीरिजचे नाव SCAM 2003 – द क्युरियस केस ऑफ अब्दुल करीम तेलगी असे होते.
स्कॅम 2003 ही मुळात अब्दुल करीम तेलगीची कथा आहे, ज्याचा स्टॅम्प पेपर घोटाळा 2003 मध्ये उघडकीस आला होता. कर्नाटकातील खानापूर येथे जन्मलेला तेलगी हा एका घोटाळ्याचा मास्टरमाईंड कसा बनला, ज्याने देशातील अनेक राज्यांमध्ये आपले पाय पसरवले आणि 20,000 कोटी रुपयांचा घोटाळा यशस्वीपणे पार पाडला हे या सीरीजमध्ये दाखवले जाईल.
महत्वाच्या बातम्या-
विशाल फटे स्कॅम: ८ दिवस चौकशी केल्यानंतर विशाल फटेने केला मोठा खुलासा, म्हणाला..
फटे स्कॅमनंतर आणखी एक घोटाळा उघड, शेतकऱ्यांना घातला सुमारे ४०० कोटींचा गंडा
फटे स्कॅम प्रकरणात विशाल फटेचे वडील, भाऊ ताब्यात; वाचा कसा झाला कोट्यावधींचा घोटाळा
Scam 2003: या अभिनेत्याला मिळाली २० हजार कोटींच्या घोटाळ्याची मास्टरमाइंड बनण्याची संधी