भारतीय क्रिकेट संघात असे 3 किलर फास्ट बॉलर्स आहेत, ज्यांची कारकीर्द चांगली सुरुवात होताच संपली. या तीन वेगवान गोलंदाजांना अधिक संधी मिळाल्या असत्या तर आज ते जसप्रीत बुमराहसारखे (jasprit bumrah) घातक गोलंदाज झाले असते. खरंतर टीम इंडियात निवड होणं जितकं अवघड मानलं जातं, तितकंच टीम इंडियात स्वत:ला टिकवून ठेवणं त्याहून कितीतरी पटीने कठीण असतं, कारण संघाबाहेर असे अनेक खेळाडू आहेत जे त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर तुम्हाला बाद करू शकतात. चला या 3 वेगवान गोलंदाजांवर एक नजर टाकूया:
1. इरफान पठाण
इरफान पठाणने 2004 साली भारतासाठी आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात धमाकेदार शैलीत केली होती. इरफान पठाणच्या गोलंदाजीत सुरुवातीला अप्रतिम स्विंग होता, त्यामुळे त्याच्या गोलंदाजीवर खेळणं कठीण होतं. इरफान पठाणला 2004 साली ICC ने ‘इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर’ हा किताब दिला होता.
पहिल्याच षटकातच हॅट्ट्रिक घेण्याचा पराक्रम करणारा तो भारताचा एकमेव गोलंदाज आहे. पण नंतर इरफान पठाण गोलंदाजीत उतरती कळा लागली. इरफान पठाणने भारतीय संघासाठी 29 कसोटी सामने, 120 एकदिवसीय सामने आणि 24 टी-20 सामने खेळले आहेत.
2. आरपी सिंग
आरपी सिंग हा देखील भारतासाठी असा गोलंदाज ठरला आहे, जो चांगल्या सुरुवातीनंतर गायब झाला. तो त्याच्या उत्कृष्ट स्विंग गोलंदाजीसाठीही ओळखला जात होता. 2007 टी-20 विश्वचषक जिंकण्यात भारतीय संघात त्याने महत्वाची भूमिका बजावली होती. पण कालांतराने आरपी सिंगने त्याचा स्विंग गमावला आणि तो प्रत्येक सामन्यात चांगलाच महागात पडला. आरपी सिंगने भारतीय संघासाठी 14 कसोटी सामने, 58 एकदिवसीय सामने आणि 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
3. मोहित शर्मा
मोहित शर्माने 2013 साली भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मोहित शर्मा आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात भारतीय संघासाठी अतिशय चांगल्या गतीने गोलंदाजी करत होता. तो त्याच्या स्विंग आणि संथ गोलंदाजीने फलंदाजांच्या नाकी नऊ आणायचा.
मोहित शर्माने 2015 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासाठी चांगली कामगिरी केली होती. पण 2015 च्या विश्वचषकानंतर त्याच्या गोलंदाजीत घसरण होत राहिली आणि त्याचा परिणाम असा झाला की तो भारतीय संघाबाहेर गेला. मोहित शर्माने भारतीय संघासाठी 26 एकदिवसीय आणि 8 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
महत्वाच्या बातम्या
हृदय पिळवटून टाकणारी घटना; लटकलेल्या वायरचा बैलाला शाॅक अन् मालकासहीत सगळेच ठार
Team india चे ‘हे’ 4 फलंदाज बळच खेचताहेत आपलं क्रिकेट करिअर, अजूनही घेत नाहीत निवृत्ती
मी टू मुव्हमेंटमुळे चर्चेत आलेल्या या अभिनेत्रीचे पुन्हा गंभीर आरोप; म्हणाली, मी आत्महत्या करणार….
Savitri Jindal: २ वर्षात १ लाख कोटी कमावणाऱ्या सावित्री जिंदाल काय करतात? वाचा देशातील सर्वात श्रीमंत महिलेबद्दल..