हॉलिवूडची पॉप गायिका ब्रिटनी स्पीयर्सने (Britney Spears) तिचा २८ वर्षीय मंगेतर सॅम असघारीसोबत लग्न केले आहे. या जोडप्याने लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथे लग्न केले. या सोहळ्याचे फोटो अद्याप सोशल मीडियावर आलेले नाहीत, मात्र लग्नाशी संबंधित ड्रामा नक्कीच लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. असे सांगितले जात आहे की ब्रिटनी स्पीयर्सचा एक्स पती जेसन अलेक्झांडरने जबरदस्तीने तिच्या लग्नात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता.(Britney Spears, Sam Asghari, Los Angeles, California)
रिपोर्ट्सनुसार, जेसन अलेक्झांडरने जबरदस्तीने ब्रिटनी आणि सॅमच्या लग्नात प्रवेश केला. सुरक्षा रक्षकाच्या हातून निसटून त्याने अस करण्याचा प्रयत्न केला होता. असेही सांगितले जात आहे की जेसनने इंस्टाग्रामवर ब्रिटनीच्या लग्नात त्याची घुसखोरी लाईव्ह-स्ट्रीम केली. व्हिडिओमध्ये तो ‘ब्रिटनी कुठे आहे?’ असे म्हणताना ऐकू येतो. याशिवाय ‘या बकवास लग्नात काय चाललंय ते मी सांगेन’ असंही तो म्हणाला होता.
मनोरंजन वेबसाइट टीएमझेडनुसार, पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या प्रकरणात, व्हेंचुरा काउंटी शेरीफ कार्यालयाने सांगितले की अधिकार्यांना कोणीतरी घुसखोरी केल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. यानंतर त्यांना कळाले की जेसन अलेक्झांडरविरुद्ध आणखी काही प्रकरणात वॉरंट जारी करण्यात आले आहे. अशा स्थितीत त्यांना अटक करण्यात आली.
ब्रिटनी आणि तिचा होणारा नवरा सॅम यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये सोशल मीडियावर त्यांच्या एंगेजमेंटची घोषणा केली होती. जरी दोघांनी लग्नाची तारीख सांगितली नव्हती. एप्रिल २०२२ मध्ये, ब्रिटनीने घोषणा केली की ती गर्भवती आहे. मात्र, महिनाभरानंतरच तिचा गर्भपात झाला.
सॅम असगरीच्या आधी ब्रिटनी स्पीयर्सचे दोनदा लग्न झाले होते. ब्रिटनीने २००४ मध्ये अमेरिकन गायक केविन फेडरलाइनशी लग्न केले. हे लग्न २००७ मध्ये संपले. या लग्नापासून त्यांना सीन प्रेस्टन फेडरलाइन आणि जेडेन जेम्स फेडरलाइन अशी दोन मुले आहेत. २००४ मध्ये ब्रिटनी आणि जेसन अलेक्झांडर यांचेही काही काळ लग्न झाले होते, जे फार काळ टिकले नाही.
महत्वाच्या बातम्या-
लग्नाआधीच राणादा अन् पाठक बाई गेले हनिमूनला? तो रोमँटिक फोटो होतोय व्हायरल
वराशिवाय लग्न का केलं? फक्त क्षमा बिंदू नाही तर या सेलिब्रिटींनीही केलंय स्वत:शीच लग्न
हृदयद्रावक! लग्नाची पत्रिका देवासमोर ठेवण्यासाठी गेलेल्या नवरदेवासह दोन तरुणांचा अपघातात मृत्यू
कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या शाहरुखने नयनताराच्या लग्नाला लावली हजेरी; पाहा फोटो