सध्या स्टार प्रवाहावरील ठिपक्यांची रांगोळी मालिका सर्वात जास्त चर्चेत आली आहे. या मालिकेत अल्लड अपूर्वा शशांकच्या प्रेमात पडायला लागली आहे. हळूहळू शशांक ही अपूर्वावरचे प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. शशांक आणि अपूर्वा लग्न झाल्यापासून कुठे ही फिरायला गेले नसल्यामुळे कुकी गँग त्यांच्या हनीमूनची प्लॅनिंग करताना दिसत आहे.
यात अपूर्वा देखील हनिमूनला जाण्यासाठी उतावीळ झाली आहे. परंतू शशांक अपूर्वासोबत कुठे ही फिरायला जाण्यास नकार देत आहे. त्यामुळे त्याला तयार करण्याची जबाबदारी अपूर्वाने स्वीकारली आहे. येत्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की , दादाकाका मला पहाटे कुकीची नोकरी गेल्याचे स्वप्न पडले असल्याचे सांगणार आहेत. यावर माई आणि कुकी चिंतेत पडणार आहेत.
यावर दादाकाका म्हणतो, कुकी तू इतक्या सुट्ट्या घेतोय की हे स्वप्न लवकरच खरे ठरेल असे मला वाटत आहे. यानंतर दादाकाका म्हणतो, अरे मी मस्करी केली. यावर कुकी म्हणतो, नाही दादाकाका मी रोज कामावर जाईल. सुट्टी घेणार नाही. यानंतर दादाकाका अमेयला ही ओरडू लागतात. तू जर रोज कामावर जाणार नाही असं म्हणशील तर तुझ्या मुलांसमोर काय आदर्श ठेवशील असा प्रश्न दादाकाका अमेयला विचारतात .
यावर अपूर्वा उत्तर देत म्हणते, दादाकाका मुल नेहमी आपल्या पालकांच्या विरुद्ध असतात. आता माझे बाबा बघा किती हुशार आहेत. आणि मी बघा. यानंतर दादाकाका चिडून निघतात. त्यावर अपूर्वा लगेच त्यांना थांबवत आपण सर्व हनिमून पिकनिकला जाणार असल्याचे म्हणते. यावर पुन्हा दादाकाका चिडून तुम्ही सर्वजण जावा अशी प्रतिक्रिया देतात.
यानंतर सुवर्णा काकू हनिमूनला फक्त नवरा बायकोच जातात असे सांगते. परंतु हे ऐकताच अपूर्वा सर्वांना म्हणते की, शशांक मला क्रिश सोबत हनिमूनला जा असे म्हणतोय. अपूर्वाचे हे बोलणे ऐकताच सर्वजण शशांकवर चिडतात. आणि त्याला अपूर्वाची माफी मागण्यास सांगतात. शशांक ही काही न म्हणता अपूर्वाची माफी मागतो.
मात्र आपण तरी देखील फिरायला येणार नाही असेच शशांक म्हणतो. यावर चिडून अपूर्वा शशांकच्या अंगावर जाते. या दोघांच्यातील भांडण मिटवण्यासाठी घरचे मधे पडतात. दरम्यान आता शशांक अपूर्वासोबत हनिमून पिकनिकला जायला तयार होईल का हे पाहणे मजेशीर ठरणार आहे. पुढील भागात आपल्याला अपूर्वा सासऱ्यासोबत पुरणपोळी बनवताना दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या
‘१७ वर्षांत ३९९ काश्मिरी पंडित मारले पण १५००० मुस्लिम देखील मारले गेले’, काँग्रेसच्या वादग्रस्त ट्विटनंतर लोक भडकले
गांजा विकत होता गोव्यात, सुगावा लागला महाराष्ट्रातून; पोलिसांनी ‘अशा’ आवळल्या मुसक्या
कामावर रजा टाकून व्यापाऱ्याकडून लुटले ४५ लाख, पुणे पोलिसांचा कारनामा, तिघांना अटक