Share

चोरट्यांनी चक्क जेसीबीनेच उचलले एटीएम; पहा सीसीटिव्हीत कैद झालेला खतरनाक व्हिडीओ

सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यामध्ये चोरट्यांनी चक्क जेसीबीनेच एटीएम फोडले असल्याचे समोर आले आहे. परंतु या चोरट्यांना एटीएममधून २७ लाख रुपये काढता आले नाहीत. सध्या आरग गावात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

शनिवारी मध्यरात्री आरग गावात चोरट्यांनी जेसीपीच्या मदतीने एटीएममधून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. या एटीएमजवळ सुरक्षारक्षक नसल्यामुळे चोरट्यांनी हे पाऊल उचलले होते. चोरट्यांनी फोडलेल्या एटीएममध्ये तब्बल २७ लाख रुपयांची रोख रक्कम होती.

मात्र एवढे प्रयत्न करून देखील चोरट्यांना ही रोख रक्कम एटीएममधून काढता आली नाही. समोर आलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री चोरांचा हा कारभार सुरू असताना याचा आवाज गावकऱ्यांपर्यंत पोहोचला. यानंतर गावकरी एटीएमच्या दिशेने येतात चोर रक्कम सोडून पसार झाले. सध्या पोलिसांना चोरांकडे असलेला जेसीबी मिळाला आहे.

अद्याप चोरांची ओळख पोलीस पटवू शकलेले नाहीत. परंतु गावातील एका व्यक्तीचाच हा जेसीबी असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे या चोरीमध्ये जेसीबी मालकाने देखील मदत केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आपल्या तपासाला सुरुवात केली आहे.

दरम्यान एटीएम फोडीची ही घटना रात्री सव्वा बाराच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना लागताच ते घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम , गुन्हे शाखेचे सर्जेराव गायकवाड, मिरज ग्रामीणचे सीपीआय चंद्रकांत बेंद्रे यांनी गावकऱ्यांची चौकशी करत घटनेविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

महत्वाच्या बातम्या
VIDEO: ट्रक ड्रायव्हरनं मोहम्मद रफींचं गाणं असं गायलं की, लोकं म्हणाले, याला म्हणतात टॅलेंट!
फौजदारानेच लावला मशिदीच्या दिशेने भोंगा! हनुमान चालिसेसह धार्मिक गाणी वाजवली; नमाज सुरू होताच..
जगप्रसिद्ध उद्योगपती एलोन मस्क बनले Twitter चे नवे मालक, कंपनीमध्ये करणार ‘हे’ नवीन बदल
मंगेशकर कुटुंबाची उंची किती? आपली उंची किती? बोलतो किती?, भाजपचा आव्हाडांवर हल्लाबोल

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now