न्यायाधीशाची धुतलेली कपडे कोणीतरी सतत चोरून नेत होते. यामुळे न्यायधीश वैतागला आणि त्या चोराला पकडण्यासाठी कर्मचार्यांच्या मदतीने सापळा रचला. सोमवारी पहाटे कर्मचार्यांच्या मदतीने न्यायाधीशाने त्या चोराला पकडले.
सोमवारी पहाटे तो चोर वाळत टाकलेली दोरीवरची कपडे चोरून पळून जाऊ लागला तेव्हा त्याला कर्मचार्यांनी पकडले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली. आरोपीला न्यायाधीशाने व त्याच्या कर्मचार्याने पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. कोल्हापूर जिल्ह्यात भुदरगड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या गारगोटी येथे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालय आहे. न्यायालयाच्या निवासस्थानी ते आपल्या कुटुंबासोबत राहतात.
घराच्या बाहेर वाळत घातलेले कापडे रोज कोणीतरी चोरून नेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या रोजच्या वैतागाने वैतागून जाऊन त्यांनी आपल्या कर्मचार्यांच्या सोबत मिळून एक योजना तयार करून त्या चोराला पकडायचे ठरवले.
सोमवारी सकाळी एक व्यक्ति निवास्थानाकडे आली आणि थेट न्यायाधीशच्या घराबाहेर वाळत घातलेली महिलांची कपडे घेऊन पळू लागली. कर्मचार्यांनी त्या चोराचा पाठलाग करून त्याला पकडले आणि भुदरगड पोलिसांच्या ताब्यात दिले.
सुशांत चव्हाण असे त्या चोराचे नाव आहे. पोलिसांनी त्या चोराच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला कोर्टात हजर केले. तेव्हा कोर्टाने त्या चोराला 3 दिवसाची कोठडी देण्याचा निर्णय केला.
महत्वाच्या बातम्या
माजी मुख्यमंत्र्यासहीत तीन बड्या नेत्यांची बंडखोरी; भाजपला भलेमोठे भगदाड
आनंद महिंद्रांनी दिलेला शब्द पाळला, पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या अवनिला दिली स्पेशल कार
मोठा खुलासा: गोविंदाने मुलगी होईपर्यंत लपवून ठेवले आपल्या लग्नाचे रहस्य, त्यामागे होते ‘हे’ कारण
मनोहर पर्रीकरांच्या मुलाला भाजपने तिकीट का दिले नाही? गोव्याच्या मंत्र्याने केला मोठा खुलासा