घरफोडीच्या अनेक बातम्या आपण नक्कीच वाचल्या असतील. याचबरोबर चोरीच्या अनेक घटनांमध्ये अनेकदा घरातील व्यक्तींना मारहाण देखील केली जाते. दिवसेंदिवस या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणत वाढ होताना पाहायला मिळत आहे. अशातच नागपूर (Nagpur) शहरात चोरीची एक विचित्र घडणा घडल्याचे उघडकीस आले आहे.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून हा प्रकार पाहून चक्क पोलिसांनी देखील डोक्याला हात लावला आहे. या प्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
ही घटना नागपूर (Nagpur) शहरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. एका चोरट्याने कुलूप बंद घरात चोरीचा करण्याचा बेत आखला, 20 फेब्रुवारीच्या मध्यरात्री त्या चोराने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरात काहीच न मिळाल्याने, रागाच्या भरात मालकासाठी एक चिठ्ठी लिहिली आहे.
मात्र, घरात तीन हजार रुपयांच्या व्यतिरिक्त काहीही किंमती ऐवज त्याच्या हाती लागला नाही, त्यामुळे चिडलेल्या चोराने एका कागदावर “मी काहीही चोरलेले नाही, भिकारी” असं लिहून आपला संताप व्यक्त केला आणि पळ काढला. भामट्याचं कृत्य पाहून पोलिसांनी देखील डोक्याला हात लावला आहे.
तसेच ते कुटुंब 23 फेब्रुवारीच्या रात्री पंढरपूरवरून नागपूरला परतले. त्यांना घराचा मुख्य दरवाजा तोडलेला दिसला. घरातल्या वस्तू विखुरलेल्या अवस्थेत आढळल्या. घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्या कुटुंबाने चोरट्यांनी घरातून काय चोरून नेले आहे हे पाहिले.
दरम्यान, घरात चोरी झाली असून तीन हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची फिर्याद घरमालकानं 24 फेब्रुवारी रोजी पोलिसात दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हुडकेश्वर पोलीस आरोपी चोरट्याचा शोध घेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
टिकेच्या भडीमारानंतर राज्यपालांना झाली उपरती! शिवरायांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावर आता म्हणतात की…
पैसा वसुल! ३०० करोडपेक्षा जास्त बजेट असलेले ‘हे’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ
वा रे पठ्ठ्या! संभाजीराजेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी १२ वर्षीय मावळ्याने अडवली थेट राऊतांची गाडी
इतिहासातील काही नवीन तथ्य मला काही लोकांनी सांगितले, त्या तथ्यांनुसार.., राज्यपालांनी दिलं स्पष्टीकरण