घरफोडीच्या अनेक बातम्या आपण नक्कीच वाचल्या असतील. याचबरोबर चोरीच्या अनेक घटनांमध्ये अनेकदा घरातील व्यक्तींना मारहाण देखील केली जाते. दिवसेंदिवस या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणत वाढ होताना पाहायला मिळत आहे. अशातच नागपूर (Nagpur) शहरात चोरीची एक विचित्र घडणा घडल्याचे उघडकीस आले आहे. (thief expressed his anger in the letter as he did not get any money at home)
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून हा प्रकार पाहून चक्क पोलिसांनी देखील डोक्याला हात लावला आहे. या प्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
ही घटना नागपूर (Nagpur) शहरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. एका चोरट्याने कुलूप बंद घरात चोरीचा करण्याचा बेत आखला, 20 फेब्रुवारीच्या मध्यरात्री त्या चोराने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरात काहीच न मिळाल्याने, रागाच्या भरात मालकासाठी एक चिठ्ठी लिहिली आहे.
मात्र, घरात तीन हजार रुपयांच्या व्यतिरिक्त काहीही किंमती ऐवज त्याच्या हाती लागला नाही, त्यामुळे चिडलेल्या चोराने एका कागदावर “मी काहीही चोरलेले नाही, भिकारी” असं लिहून आपला संताप व्यक्त केला आणि पळ काढला. भामट्याचं कृत्य पाहून पोलिसांनी देखील डोक्याला हात लावला आहे.
तसेच ते कुटुंब 23 फेब्रुवारीच्या रात्री पंढरपूरवरून नागपूरला परतले. त्यांना घराचा मुख्य दरवाजा तोडलेला दिसला. घरातल्या वस्तू विखुरलेल्या अवस्थेत आढळल्या. घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्या कुटुंबाने चोरट्यांनी घरातून काय चोरून नेले आहे हे पाहिले.
दरम्यान, घरात चोरी झाली असून तीन हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची फिर्याद घरमालकानं 24 फेब्रुवारी रोजी पोलिसात दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हुडकेश्वर पोलीस आरोपी चोरट्याचा शोध घेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
HR आणि कामगारामध्ये तूफान राडा, HR ची गाडी अडवून फोडली; वाचा नेमकं काय घडलं
संभाजीराजेंना उपोषण करावं लागलं हा माझा आयुष्यातील काळा दिवस; खासदार धैर्यशील माने यांनी बोलून दाखवली खंत
व्वा रे पठ्ठ्या! नवराईला न्यायला हेलिकॉप्टर, लेकीच्या निरोपासाठी अख्खा गाव जमला; लग्नाची जिल्ह्यात चर्चा
अय्यर-जडेजाच्या तुफान फटकेबाजीसमोर श्रीलंका गार, टिम इंडियाने मालिका जिंकली