Share

‘या’ तीन खेळाडूंमुळे टीम इंडियाने विश्वचषक जिंकला, रातोरात झाले स्टार

u19-indian-team-world-cup

भारतीय संघाने(Indian Team) शनिवारी वेस्ट इंडिजमध्ये(West Indies) इतिहास रचला आहे. भारताने पाचव्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकण्यात यश मिळविले आहे. अंतिम सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा चार गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले आहे. या सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकून इंग्लंडने फलंदाजीचा निर्णय घेतला होता.( these three players, Team India won the World Cup)

इंग्लंडच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. भारताचा वेगवान गोलंदाज रवी कुमारने बेथेल आणि कर्णधार टॉम प्रेस्ट यांना लवकर बाद केले. यानंतर उर्वरित इंग्लंडच्या संघाला भारतीय वेगवान गोलंदाज राज बावाने पॅव्हेलियनमध्ये परतवले. भारताच्या अष्टपैलू खेळाडूंनी जॉर्ज थॉमस, विल लक्सटन, जॉर्ज बेल आणि रेहान अहमद यांना लवकर बाद करून विजय मिळवण्याच्या आशा पल्लवीत केल्या.

अवघ्या ६१ धावांत इंग्लंडचे(England) सहा खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले. सामन्यात रवि कुमार आणि राज बावा यांना उत्कृष्ट गोलंदाजी केली. जेम्स रेव्ह आणि जेम्स सेल्स यांनी चांगली भागीदारी करत इंग्लंडला संकटातून बाहेर काढले. जेम्स रेव्हने ९५ धावांची शानदार खेळी केली. इंग्लंडचा संपूर्ण संघ १८९ धावांवर बाद झाला. रवी कुमारने चार आणि राज बावाने पाच गडी बाद केले.

१९० धावांच्या प्रत्युत्तरात भारताची सुरवात चंगली झाली नाही. भारतीय संघाचा सलामी फलंदाज आंगक्रिश रघुवंशीही शून्यावर बाद झाला. पण भारतीय फलंदाज शेख रशीदने अर्धशतक ठोकून भारताचा विजय खेचून आणला. भारतीय संघातील निशांत सिंधू याने देखील चांगली फलंदाजी केली. त्याने नाबाद अर्धशतक ठोकून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

मात्र संपूर्ण स्पर्धेत चर्चा झाली ती विशेषतः रवी कुमार, राज बावा आणि विकी ओसवाल या भारतीय खेळाडूंची. विकी ओसवाल हा भारतीय संघाचा डावखुरा फिरकीपटू आहे. तो मूळचा पुण्याचा आहे. विकी या स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने सहा सामन्यात १२ बळी घेतले आहेत.

रवी कुमार हा भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. रवी कुमारने १९ वर्षांखालील विश्वचषकात अप्रतिम गोलंदाजी केली आहे. त्याने सहा सामन्यांत १० बळी घेतले आहेत. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात रवीने इंग्लंडविरुद्ध ३४ धावांत चार बळी घेतले आहेत. याआधी रवीने बांगलादेशविरुद्धही अप्रतिम गोलंदाजी केली होती. त्याने अवघ्या १४ धावांत बांगलादेशच्या तीन फलंदाज बाद करून तो सामना भारताला जिंकून दिला होता.

राज अंगद बावा हा भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू आहे. तो डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने गोलंदाजी करतो. राज बावा यांनी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. युगांडाविरुद्ध त्याने १०८ चेंडूंत १४ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १६२ धावांची नाबाद खेळी खेळली होती. १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या इतिहासातील कोणत्याही भारतीय खेळाडूची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

महत्वाच्या बातम्या :-
‘भिकारी समजून मत द्या’, काँग्रेस उमेदवाराची मतदारांना अजब मागणी
केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट, महागाई भत्त्यात झाली तब्बल ‘एवढ्या’ टक्क्यांनी वाढ
‘बाळासाहेबांनंतर लतादीदीच आमचा आधार, त्यांच्या जाण्यानं आमच्या परिवारावर मोठा आघात झालाय’

खेळ

Join WhatsApp

Join Now