Gifts: बुर्ज खलिफात फ्लॅट ते आलिशान कार, महागड्या भेटवस्तुंच्या नावावर पाण्यासारखा पैसा खर्च करतात ‘हे’ स्टार्स

Gifts: इंडस्ट्रीतील अनेक मोठे सेलिब्रिटी त्यांच्या दयाळूपणासाठी खूप प्रसिद्ध आहेत. हे स्टार्स त्यांच्या चाहत्यांना तसेच त्यांच्या जवळच्या लोकांसमोर प्रेम व्यक्त करण्यात कधीच कमी पडत नाहीत. हे स्टार्स अनेकदा आपल्या जवळच्या व्यक्तींना मोठी आणि महागडी भेटवस्तू देताना दिसतात. आलिशान वाहनांपासून ते अनेक मौल्यवान हिरे-दागिनेही आपल्या प्रियजनांना दिले आहेत. आजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये जाणून घ्या, महागड्या गिफ्ट्स देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बॉलिवूड स्टार्सची नावे. Celebrity, Rani Mukherjee, Gifts, Bhushan Kumar

भूषण कुमार (Bhushan Kumar)
टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांनाही महागड्या भेटवस्तू द्यायला आवडतात. अलीकडेच त्यांनी आदिपुरुषचे दिग्दर्शक ओम राऊत यांना सुमारे 4.8 कोटी रुपयांची फरारी एफ8 ट्रिब्युटो भेट दिली आहे.

शाहरुख खान
बॉलीवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खानने (Shah Rukh Khan) ‘रावन’ चित्रपटाच्या कलाकारांना BMW 7 सीरिजच्या 5 सेडान कार भेट दिल्या, ज्यामध्ये प्रत्येक कारची किंमत 1 कोटी रुपये होती.

राज कुंद्रा
प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) यांनी त्यांची पत्नी शिल्पा शेट्टी हिला एनीवर्सरीनिमित्त बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीच्या 19व्या मजल्यावरील फ्लॅट भेट दिला, ज्याची किंमत 50 कोटी रुपये आहे.

करण जोहर
करण जोहरच्या (Karan Johar) ‘अग्निपथ’ चित्रपटातील ‘चिकनी चमेली’ गाण्यासाठी अभिनेत्री कतरिना कैफने कोणतेही शुल्क घेतले नाही, त्यानंतर करणने कतरिनाला 2 कोटी रुपयांची लाल रंगाची फरारी कार भेट दिली.

सलमान खान
‘दबंग 3’ चित्रपटाच्या रिलीजनंतर सलमान खानने (Salman Khan) कन्नड सुपरस्टार किचा सुदीपला BMW M5 भेट म्हणून दिली. किचा या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता.

आदित्य चोप्रा
लग्नापूर्वी आदित्य चोप्राने (Aditya Chopra) राणी मुखर्जीला 1.25 कोटी रुपयांची Audi A8 W12 कार गिफ्ट केली होती, त्यानंतर सगळ्यांना त्यांच्या नात्याची सत्यता कळली.

आमिर खान
आमिर खानने (Aamir Khan) त्याची माजी पत्नी किरण राव हिला बेव्हरली हिल्स येथे 75 कोटी रुपयांचे हॉलिडे होम गिफ्ट केले आहे. किरणसाठी ते स्वप्न पूर्ण झाल्यासारखे होते.

बाहुबली मेकर्स
बाहुबलीच्या ((Bahubali) पहिल्या भागाने जगभरात खळबळ उडवून दिली होती. या चित्रपटाच्या यशाने खूश होऊन चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रभासला दीड कोटी रुपयांची जिमची उपकरणे भेट दिली.

अभिषेक बच्चन
जेव्हा मुलगी आराध्या एक वर्षाची होती, तेव्हा अभिषेकने (Abhishek Bachchan) तिला बीएमडब्ल्यू मिनी कार खरेदी केले, ज्याची किंमत सुमारे 25 लाख रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या-
Aamir Khan : आमिर खान आहे १७९० कोटींचा मालक पण अजूनही ‘या’ ४ स्टार्सच्या तुलनेत आहे गरीब
Vijay Deverakonda : विजय देवरकोंडाने ‘लायगर’ चित्रपटासाठी घेतले तब्बल ‘एवढे’ कोटी, मोठमोठ्या स्टार्सला टाकले मागे
Pushpa: पुष्पा २ साठी अल्लू अर्जुनने घेतलं रश्मिकापेक्षा दहापट मानधन, बॉलिवूड स्टार्सही पडतील फिके