भारतीय क्रिकेट संघाचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकची (Umran Malik) सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. जगभरातील दिग्गज त्याला भविष्यातील स्टार म्हणत आहेत आणि अनेक महान गोलंदाजांशी त्याची तुलना केली जात आहे. ऑस्ट्रेलियन दिग्गज ब्रेट लीने उमरानच्या वेगवान गोलंदाजीचे वर्णन माजी पाकिस्तानी गोलंदाज वकार युनूसशी केले. यावर उमरानने त्याची प्रतिक्रिया दिली असून त्याने भारतीय गोलंदाजांना रोल मॉडेल मानत असल्याचे म्हटले आहे.(Umran Malik, Waqar Younis, Role Model, Follow)
उमरान म्हणाला, मी वकार युनूसला फॉलो केलेले नाही. माझी स्वतःची एक नैसर्गिक कृती आहे. माझे आदर्श तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार आहेत. जेव्हा मी खेळायचो, तेव्हा मी त्याच्यासोबत असायचे आणि त्यांना फॉलो करायचो. जेव्हा मी त्यांच्यासोबत असायचो तेव्हा मी खूप काही शिकण्याचा प्रयत्न केला.
उमरान म्हणाला, असे भावनेच्या भरात वाहून जाण्यात काही अर्थ नाही. नशिबात जे काही लिहिले आहे ते घडलेच पाहिजे. मला माझ्या देशासाठी माझे सर्वोत्तम द्यायचे आहे. मला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ५ टी-२० मालिकेसाठी संधी देण्यात आली. माझे ध्येय असेल, या सर्व सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी आणि एकट्याने टीम इंडियाला सामन्यांमध्ये विजय मिळवून द्यावा.
तो पुढे म्हणाला, सर्व भारतातून मला मिळालेल्या आदर आणि प्रेमाबद्दल सर्वप्रथम मी खूप आभारी आहे. नातेवाईक आणि इतर लोक सतत माझ्या घरी येत असतात, खूप छान वाटतं. IPL नंतर मी थोडा व्यस्त झालो, पण मी माझे प्रशिक्षण आणि सराव कधीही चुकवला नाही.
इंडियन प्रीमियर लीगच्या १४व्या सीजनमध्ये उदयास आलेल्या उमरानने अलीकडच्या सीजनमध्ये चांगली कामगिरी केली. सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या उमरानने १४ सामन्यांत २२ विकेट घेतल्या, त्यात गुजरातविरुद्ध २५ धावांत ५ विकेट्सची सर्वोत्तम कामगिरी केली. निवडकर्त्यांनी त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी T20I मालिकेसाठी संघात समाविष्ट करून स्पर्धेतील त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीचे बक्षीस दिले.
महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सला मिळणार ट्रॉफी जिंकण्याची दुसरी संधी, IPL नंतर दुबई लीगमध्ये उतरणार संघ
सोहेल खानसोबत संसार मोडणारी सीमा खान आहे मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूची मेहुणी, जाणून घ्या
मुंबई इंडियन्ससोबत टीम इंडियाचेही टेन्शन वाढले, दुखापतीमुळे हा स्टार खेळाडू संघातून बाहेर
जेवण पाहून ढसाढसा रडला मुंबई इंडियन्सचा हा खेळाडू, कारण वाचून तुमचेही डोळे पाणावतील