Share

‘या’ बाॅलीवूड अभिनेत्यांनी जीवनात केलाय जबरदस्त संघर्ष; केली आहेत वाॅचमन, वेटरची कामे

बॉलिवूडमधील अनेक कलाकार आहेत ज्यांनी गरिबीतून आपले करिअर घडवले आहे. अनेक कलाकारांनी हलाकीच्या दिवसातून हे यश मिळवले आहे. यामध्ये अनेक अभिनेत्यांची समावेश आहे. ज्यांनी आपल्या उदरनिर्वाह साठी पडेल ते काम करून दिवस काढले आहेत. इतकेच नव्हे तर या अभिनेत्यांनी वॉचमनपासून ते वेटरपर्यंतचे कामे केले आहेत.

 

यामध्ये रणवीर सिंह, सिद्धार्थ मल्होत्रापासून ते दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन या अभिनेत्यांची समावेश आहे. या अभिनेत्यांनी अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये येण्या अगोदर अनेक छोटीमोठी कामे केली आहेत. मात्र या अभिनेत्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवुडमध्ये आपले स्थान निर्माण केले.

१) सिद्धार्थ मल्होत्रा

बॉलिवूडचा चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जाणार अभिनेता म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा. सिद्धार्थने खूप कमी कालावधीत चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले. अनेक तरुणी त्याच्या दिवाण्या आहेत. मात्र सिद्धार्थ एक अभिनेता असण्यापूर्वी तो एक मॉडेल होता. त्याने वयाच्या १८ व्या वर्षांपासून मॉडेलिंग सुरू केली. त्यानंतर त्याने ‘माय नेम इज खान’ मध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले होते. तसेच या चित्रपटाचा डायरेक्टर करण जोहर होता.

२) नवाजुद्दीन सिद्दीकी

सध्या बॉलिवूडमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी हे नाव खूप मोठे झाले आहे. नवाजुद्दीन यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पडली. मात्र त्यांनी खूप गरीब परिस्थितीतून हे यश संपादन केले. त्यांनी कुटुंबाचे पालन कार्यासाठी केमिस्ट म्हणून काम केले होते. इतकेच नव्हे तर त्यांनी दिल्लीत आपल्यानंतर ही काही दिवस त्यांनी वॉचमन म्हणून काम केले होते.

३) सोनाक्षी सिन्हा

सोनाक्षी सिन्हा हे सध्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध नाव आहे. दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची ती मुलगी. मात्र असे असूनही तिने थेट अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले नाही. अभिनय क्षेत्रात येण्या अगोदर दिले. कॉस्टुयम डिझायनर म्हणून काम केले आहे. ‘मेरा दिल लेके देखो’ या चित्रपटात तिने कॉस्टुयम डिझायनरचे काम केले होते.

४) रणवीर सिंह

बॉलिवुडचा प्रसिद्ध अभिनेता असलेला अभिनेता रणवीर सिंह सध्या यशाच्या शिखरावर आहे. त्याने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली. मात्र बॉलिवूडमध्ये त्यांचा कोणताही गॉड फादर नसताना त्याने आपले स्थान निर्माण केले. त्याने अनेक सुपरहिट चित्रपटातही काम केले. मात्र अभिनेता म्हणून येण्या अगोदर त्याने जाहिरात कंपनीत कॉपी राईटर म्हणून काम केले आहे.

https://www.instagram.com/p/CbFryAnsDKP/?utm_medium=copy_link

५) बोमन इराणी

बोमन इराणी यांनी आपल्या अभिनयाने नेहमी चाहत्यांचे मनोरंजन केले. त्यांनी अनेक चित्रपटात काम करत आपले स्थान प्रेक्षकांच्या मनात निश्चित केले. त्यांनी खूप उशिरा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र कमी कालावधीत त्यांनी हे यश मिळवले. एक अभिनेता म्हणून येण्या अगोदर त्यांनी मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये वेटर आणि रूम सर्व्हिस अटेंडेंट म्हणून काम केले होते.

६) अक्षय कुमार

सध्या अक्षय कुमार हा बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून ओळखला जातो. अक्षय कुमार सध्या यशाच्या शिखरावर आहे. त्यांचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. मात्र तो एक अभिनेता म्हणून येण्या अगोदर त्याने बँकॉकमध्ये चेफ आणि वेटर म्हणून काम केले आहे. तसेच एक मुलाखतीमध्ये ही त्याने सांगितले होते की, तो कुंदनचे दागिने विकत होता.

७) अभिताभ बच्चन

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट बनवले. त्यांनी देखील अनेक खस्ता खात हे यश मिळवले. अभिनेता म्हणून येण्या अगोदर त्यांनी शिपिंग कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केले होते. त्याचबरोबर त्यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये देखील काम केले मात्र त्यांच्या कणखर आवाजामुळे त्यांना रिजेक्ट केले.

८) रजनीकांत

रजनीकांत यांनी साऊथ चित्रपटसृष्टीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना नेहमी प्रभावित केले. तसेच त्यांनी हे समीकरण देखील मोडीत काढले की, अभिनेता होणे हे देखणेपणावर नसून अभिनयावर असते. मात्र ते एक अभिनेता असण्यापूर्वी बस कंडक्टर होते.

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now