महाराणी एलिझाबेथ द्वितीय सर्वाधिक काळ राजगादीवर राहिलेल्या युकेच्या महाराणी यांचं वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झालं.६ फेब्रुवारी १९५२ रोजी क्वीन एलिझाबेथ यांचा राज्याभिषेक झाला. क्वीन एलिझाबेथ यांचे वडील किंग जॉर्ज सहावे यांच्या निधनानंतर क्वीन एलिझाबेथ या गादीवर आल्या होत्या. सर्वात जास्त काळ काम करणाऱ्या सम्राट म्हणून त्या ओळखल्या जातात.
मागील वर्षी पहिल्यांदाच राणी एलिझाबेथ यांचा कोविडने त्रस्त झाल्या होत्या. त्यात देखील त्या आपले कर्तव्य निभावत होत्या. तेव्हा ब्रिटीश प्रसारमाध्यमांनी ७० वर्षे यशस्वीपणे महाराणीची कर्तव्ये पार पाडण्याऱ्या क्विन एलिझाबेथचे कौतुक केले. मुख्य कारण म्हणून संकटकाळातही शांत, एकत्रित, खंबीर आणि नेहमी हसतमुख दिसण्याच्या क्विनच्या क्षमतेचे कौतुक केले.
एलिझाबेथ त्यांच्या हसतमुख चेहऱ्यासाठी, विनोदबुद्धीची लोकप्रिय होत्या. शिवाय राणी एलिझाबेथ यांनी एका कार्यक्रमात जाहीरपणे म्हटले होते की, ‘आपण स्वतःला जास्त गांभीर्याने घेऊ नये. आपल्यापैकी कोणाचीही शहाणपणावर मक्तेदारी नाही.’ यावरून राणी एलिझाबेथ यांचा मोकळा स्वभाव दिसून येतो.
राजेशाही इतिहासकार रॉबर्ट लेसी यांनी एका मुलाखतीत एलिझाबेथ यांच्याबद्दल बोलताना सांगितले की, हसणे हे क्विन एलिझाबेथ यांच्यासाठी जगण्याचे एक महत्त्वाचे तंत्र आहे. राणीची हसण्याची क्षमता हा एक महत्त्वाचा खाजगी दागिना आहे. महाराणी ज्या पदावर होत्या तेथे थोडं कठोर राहणं आवश्यक होतं तेथे क्विन एलिझाबेथ मात्र उत्साही आणि आनंदी असायच्या.
राणी एलिझाबेथ या खूप चांगल्या नकलाकार होत्या. क्विन एलिझाबेथ यांनी माजी रशियन नेते बोरिस येल्त्सिन यांच्यावर चांगली छाप पाडली आणि इतर राजकारणी आणि टीव्ही पात्रांचे देखील अनुकरण केले. राणीने कायमच त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांची भीती दूर केली.
ही भीती दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या विनोदी शैलीचा वापर केला. जेव्हा तिला समजले की ते आरामात नाहीत, तेव्हा राणी विनोद करू लागली. राणी एलिझाबेथ यांनी कायमच आपल्या विनोदाच्या शब्दप्रयोगाने त्या तणावपूर्ण परिस्थितींना आनंददायी बनवले. लोकांना या सगळ्यागोष्टी फार लक्षात राहायच्या, अशी माहिती लसी यांनी दिली.