Share

अखेर ठरलं! ‘या’ दिवसांत मलायका अरोरा-अर्जुन कपूर अडकणार लग्नबंधनात, अभिनेत्याने सोडले मौन

कतरिना कैफ, विकी कौशल आणि आलिया भट्ट, रणबीर कपूर यांच्या लग्नानंतर आता आणखी एका बॉलिवूड कपल लग्नासाठी सज्ज झाल आहे. होय, चाहत्यांची आवडती जोडी अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. मलायका आणि अर्जुन एकमेकांना डेट करत चार वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आता हे कपल त्यांच्या नात्याला नाव देण्याच्या तयारीत आहे.(Arjun Kapoor, Malaika Arora, Married)

वृत्तानुसार, अर्जुन आणि मलायका २०२२ च्या अखेरीस लग्नबंधनात अडकणार आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाला तर, मलायका आणि अर्जुन या हिवाळ्यात नोव्हेंबर किंवा डिसेंबरपर्यंत लग्न करण्याचा विचार करत आहेत. तसेच या लग्नाला फक्त त्यांचे कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. रणबीर-आलिया आणि कतरिना-विकी कौशलप्रमाणेच यांचे लग्नही मुंबईत गुपचूप पद्धतीने होणार आहे.

https://www.instagram.com/p/CV94fO3oxGO/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेता अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर मलायका अरोरा दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे. रिपोर्ट्सनुसार, अर्जुन आणि मलायकाला भव्यदिव्य पद्धतीने लग्न करायचे नाही. दोघांचाही साधेपणावर विश्वास आहे आणि म्हणूनच लग्नाची नोंदणी केल्यानंतर ते एका भव्य पार्टीचे आयोजन करतील. या पार्टीचे आयोजन फिल्म इंडस्ट्रीतील सदस्य आणि या जोडप्याच्या अगदी जवळचे लोक करणार आहेत.

या दरम्यान कुटुंबातील सदस्यांमध्ये संपूर्ण कपूर कुटुंब आणि मलायकाचे पालक सामील होतील. करीना कपूर खान देखील या जोडप्याच्या खूप जवळ आहे, त्यामुळे तिचे नाव देखील पाहुण्यांच्या यादीत समाविष्ट केले जाऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, मलायका आणि अर्जुन त्यांच्या लग्नाच्या ड्रेसवर जास्त खर्च करणार नाहीत. लग्नाच्या नोंदणीच्या दिवशी, मलायका साध्या पण आकर्षक साडीत, तर अर्जुन साध्या कुर्त्यात असू शकतो. दोघेही पार्टीसाठी वेस्टर्न आउटफिट निवडू शकतात.

एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अर्जुन आणि मलायकाच्या लग्नाच्या चर्चा या आधीही खूप रंगल्या होत्या. २०२१ च्या मध्यापर्यंत दोघांनाही गुपचूप साखरपुडा करायचा होता, पण कोरोना महामारीमुळे ते साखरपुडा करू शकले नाही. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके बुडाले आहेत की आता ते लवकरच लग्नच करतील, अशी त्यांच्या जवळच्या लोकांना खात्री आहे. पण अजुन लग्नाची तारीख निश्चित झाली नाही.

मलायका आणि अर्जुन दोघंही आता आपल्या नात्याबद्दल उघडपणे बोलतात. कसलाच आडपडदा ठेवत नाहीत. काही दिवसांपूर्वी मलायकानं अर्जुनचं कौतुक केलं होतं. माय मॅन असं म्हटलं होतं. लग्नाबद्दल विचारलं असता, यावर विचार करतोय असंही म्हणाली होती. मलायका आणि अर्जुनच्या वयात खूप अंतर आहे. मलायका ४८ वर्षांची आहे, तर अर्जुन ३६ वर्षांचा आहे.

महत्वाच्या बातम्या-
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर लवकरच लग्नबंधनात अडकणार; या दिवशी वाजणार सनई चौघडा
भर पार्टीत या व्यक्तीने खेचली मलायका अरोराच्या बॅकलेस ड्रेसची दोरी, फोटो झाले व्हायरल
गेल्या काही दिवसातील घटना चित्रपटातील भयानक दृश्यासारख्या अपघातातून सावरल्यानंतर मलायका अरोराची भावनिक पोस्ट
मलायका अरोराने सर्वांसमोर खोलली होती अरबाज खानची पोल, वाचून चाहतेही झाले होते हैराण

 

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now