पाळीव प्राणी आवडतात? कुत्रा पाळण्याची आवड आहे? मग नक्कीच वाचा. जगात अशा कुत्र्यांच्या १० प्रजाती आढळतात, ज्या अत्यंत धोकादायक आहेत. चला तर पाहुयात. “ग्रेट डॉन” या प्रजातीचा कुत्रा ट्रेनिंगनंतरच पाळला जातो. ट्रेनिंग न देता पाळल्यास तो तुमचा जीव घेऊ शकतो. अत्यंत आक्रमक असणाऱ्या या कुत्र्याला ‘किलिंग मशीन’ म्हणून ओळखले जाते. (These are the most dangerous dog breeds in the world)
“पिटबुल” हा कुत्रा अत्यंत आक्रमक असतो. त्याचे वजन १६ ते ३९ किलो दरम्यान असते. त्याला राग आला तर तो कोणाचाच नसतो. या कुत्र्याने लखनऊमध्ये एका वृद्ध महिलेवर हल्ला करून तिला मारले होते. या पिटबुलला ४१ देशांमध्ये पाळण्यास बंदी आहे.
“जर्मन शेफर्ड” प्रजातीचा कुत्रा पोलीस विभागात गुन्हेगारांना पकडण्यासाठी वापरला जातो. ३० ते ४० किलो वजन असणाऱ्या या कुत्र्यावर पण अनेक देशांमध्ये बंदी आहे. भारतात मात्र नाही. “रॉट वेल्लर” हा कुत्राअतिशय शक्तिशाली असतो. तो कोणाचाही चावा लगेच घेतो. या कुत्र्याला पाळण्यात अनेक देशात बंदी आहे. भारतात मात्र तो अनेक घरात पाळला जातो.
“डाबरमॅन पिंचर” हा कुत्रा पोलीस विभागांमध्ये वापरला जातो, तसेच घरातही पाळला जातो. अनोळखी व्यक्तींवर तो लगेच चवताळतो मात्र मालक दिसताच शांत होतो. या कुत्र्यावर अनेक देशांमध्ये बंदी आहे. “बुलमास्टिफ” हा कुत्रा खूप आक्रमक असतो. ५५ ते ६० किलो वजनाचा हा कुत्रा पिटबुल सारखाच दिसतो.
“हस्की” हा कुत्रा दिसायला अत्यंत क्युट आणि हुशारही असतो. त्याला ‘स्लेज डॉग’ म्हंटले जाते, कारण बर्फाळ डोंगराळ प्रदेशात तो गाड्या ओढतो. २० ते २७ किलो वजन असणारा हा कुत्रा राग आल्यावर खूप आक्रमक होतो. “मालाम्युट” प्रजातीचा कुत्रा लांडग्यासारखा दिसतो. उत्तर अमेरिकेत आढळणाऱ्या ह्या कुत्र्याचे वजन ५० किलो वजन असून तो खूप हुशार आणि आक्रमक असतो.
“वोल्फ हायब्रिड” हा कुत्रा लांडग्यासारखा दिसायला असतो. तो कोणावरही हल्ला करतो. त्यामुळे त्याला पाळण्यात अनेक देशांमध्ये बंदी आहे. “बॉक्सर” हा कुत्रा ‘शिकारी कुत्रा’ म्हणूनही ओळखला जातो. तो तोंडात शिकार येताच १० मिनिटात त्याचे लचके पडतो. पण अनेकवेळा तो आपल्या मालकावरच हल्ला करत असल्याने त्याला पाळण्यास अनेक देशांमध्ये बंदी आहे.
महत्वाच्या बातम्या-
अनेकांनी साथ सोडली पण शिवसेनेचा बडा नेता ठाकरेंशी एकनिष्ठ, उद्धव ठाकरेंना फोन लावून म्हणाला..
बॉलीवूडची बेबो तिसऱ्यांदा बनणार आई?; वाढलेलं पोट लपवतेय,पण फोटो व्हायरल
शिवसेनेनंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार फोडणार? मुख्यमंत्र्यांनी केला धक्कादायक दावा