Share

‘ह्या खऱ्या जिजाऊच्या लेकी’; किरण मानेंची बाजू घेणाऱ्या महीला कलाकारांचे आव्हाडांनी केले कौतूक

jitendra avhad

गेल्या काही दिवसांपासून ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील प्रमुख कलाकार किरण माने चर्चेत आहेत. त्यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून कोणतेही कारण न देता काढण्यात आलं होत. यावर राजकीय भूमिका घेतली म्हणून मालिकेतून काढण्यात आल्याचा आरोप त्यांनी निर्मात्यांवर केला होता. त्यानंतर या मालिकेतील काही कलाकार त्यांच्याविरोधात उभे राहिल्याचे दिसून आले.

सध्या या प्रकरणात एक नवीन घडामोड दिसून येत आहे. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढल्यानंतर अभिनेते किरण माने आणि स्टार प्रवाह वाहिनीचे कंटेन्ट हेड सतीश राजवाडे यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे देखील उपस्थित होते. ही भेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर आयोजित करण्यात आली होती.

या भेटीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपलं मत मांडलं आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “किरण माने प्रकरणात स्टार प्रवाहचे सतीश राजवाडे यांच्यासोबत चर्चा केली आहे. आम्ही त्यांना विचारलं की किरण माने यांना याआधी नोटीस दिली होती का? एखाद्या कलाकाराला याप्रकारे बाहेर काढणं हे माणुसकीच्या विरोधातली घटना आहे, असं मला वाटतं.”

“सर्व स्त्री कलाकारांनी किरण माने यांची बाजू घेतली आहे. स्टार प्रवाहचे प्रॉडक्शन हाऊसचे लोक येऊन मला भेटणार आहेत. एका स्त्रीने त्यांच्यावर आरोप केला पण बाकीच्या स्त्री कलाकारांनी त्यांची बाजू घेतली आहे. तसं दिसूनही येतंय. पुढे त्यांनी प्रश्न केलाय की, प्रॉडक्शन हाऊसने त्यांना कधी सांगितले होते का? एक चांगली मालिका बंद होऊ नये, एवढीच आमची इच्छा आहे”, असे देखील मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले.

मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अभिनेते किरण माने यांची बाजू घेतल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “मी एकदा भूमिका घेतली त्यातून मी पाय मागे घेत नाहीय. हा वैचारिक लढा नाहीये. हा राजकीय अभिनिवेश नाहीय. किरण माने हे प्रकरण माझ्यापर्यत आले म्हणून मी त्यांची बाजू घेतली आहे.”

“एका प्रॉडक्शन हाऊस विरुद्ध महिला कलाकाराने किरण माने याची बाजू घेतली या खऱ्या जिजाऊंच्या लेकी आहेत”, असं म्हणत त्यांनी किरण मानेंची बाजू घेणाऱ्या कलाकारांचं कौतुकही केलं आहे. यापूर्वी देखील काही मराठी वाहिन्यांनी कारण न देता कलाकारांना काढले आहे. अशा गोष्टी थांबवण्यात याव्यात, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी भेटीनंतर केली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
राजकीय नेत्याची गर्भवती वनरक्षक महीलेला व तिच्या पतीला रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल
किरण माने, सतीश राजवाडेंच्या भेटीत नेमकं काय घडलं? जितेंद्र आव्हाडांनी सांगीतले…
जावेद अख्तर यांचे दोन्ही बायकांसोबत फॅमिली फोटोशूट; फोटो पाहून लोकं म्हणाली..

राज्य

Join WhatsApp

Join Now