Share

‘हे बोगस आणि फ्रॉड लोकं..’; राऊतांनी राणा दाम्पत्याचा बुरखा फाडणारा पुरावाचा समोर आणला

हनुमान चालिसा वादात अडकलेल्या नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांना फ्रॉड, बोगस असे म्हणत टोला लगावला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात वाद प्रतिवाद वाढताना दिसत आहे. यावेळी संजय राऊत यांनी देखील ट्विट करून राणा दाम्पत्याला टोला लगावला आहे. त्यांनी लिहिले की, “हे लोक फसवे आणि बोगस आहेत आणि ते आम्हाला हनुमान चालिसा शिकवतील”.

दरम्यान, अमरावतीचे खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री येथे हनुमान चालिसा पठणाची घोषणा केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी त्यांच्या घराला घेराव घातला. त्यानंतर त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप करून पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्यावर 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल झाला.

https://twitter.com/rautsanjay61/status/1518453225539743750?t=zamAnWXb2tMHgyjhInImRg&s=19

त्यानंतर त्यांना काल न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयात दोघांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती मात्र, ती फेटाळण्यात आली. न्यायालयाने दोघांना 6 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले. नवनीत राणा यांना भायखळा तुरूंगात तर आमदार रवी राणा यांना ऑर्थर रोड कारागृहात ठेवण्याचा निर्णय दिला.

दरम्यान, संजय राऊत म्हणाले की,  राणा दाम्पत्य महाराष्ट्रात धार्मिक उद्रेक निर्माण करून सत्ता उलथवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर पोलिसांकडून लावण्यात आलेले राजद्रोहाचे कलम योग्यच आहे, असे म्हणाले.

राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. हा न्यायालयाचा निर्णय आहे, सरकारचा नव्हे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. प्रत्येक कारवाई ही कायद्यानेच होते, असे संजय राऊत म्हणाले. तसेच भाजपवर आरोप केला की, आधी संघर्ष निर्माण करायचा. मग त्यांच्या मनानुसार घडलं की राज्यपालांकडे जायचं. राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे जाऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावायची, हा कट भाजप रचत असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

राज्य राजकारण

Join WhatsApp

Join Now