Share

टायगर ३ पासून ते पठाणपर्यंत, ‘या’ ऍक्शन चित्रपटांनी हादरून जाईल थिएटर, वाचा संपुर्ण यादी

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये दरवर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होतात, जे लोकांना थिएटरमध्ये शिट्ट्या वाजवण्यास भाग पाडतात. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून चित्रपटगृहे बंद असल्याने चित्रपट रसिकांची निराशा झाली होती. आता पुन्हा वातावरण पूर्वपदावर येत आहे आणि सिनेमागृहे गजबजली आहेत. आता 2022 ते 2023 पर्यंत सर्व अॅक्शन चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहेत. त्या चित्रपटांची संपूर्ण यादी आज आपण पाहणार आहोत.(these action movies will shake the theater, read the full list)

टाइगर 3

टाइगर 3
सलमान खान आणि कतरिना कैफच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक, ‘टायगर 3’ 2023 मध्ये ईदला प्रदर्शित होणार आहे. याचाच अर्थ सलमान खान पुन्हा एकदा ईदला त्याचा आणखी एक चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. हा चित्रपट 21 एप्रिल 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

फाइटर

फाइटर
फायटर या चित्रपटातून हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट 26 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. हृतिक आणि दीपिकाला एकत्र पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

पठान

पठान
शाहरुख खान बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. आता तो ‘पठान’ चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. त्याचा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘पठान’ चित्रपटात जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण यांच्याही भूमिका आहेत.

धाकड़

धाकड़
कंगना राणौतच्या ‘धाकड’ या चित्रपटाची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. तिचा हा चित्रपट 27 मे 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मुलांची तस्करी आणि महिलांच्या शोषणाची कथा दाखवण्यात येणार असून कंगना राणौत एजंट अग्निच्या भूमिकेत गुन्हेगारांशी लढताना दिसणार आहे.

हीरोपंती 2

हिरोपंती 2
टायगर श्रॉफचा चित्रपट ‘हीरोपंती 2’ 29 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत तारा सुतारिया दिसणार आहे. विशेष म्हणजे टायगर श्रॉफने 2014 साली ‘हिरोपंती’ या चित्रपटातून पदार्पण केले होते.

अटैक

अटॅक
जॉन अब्राहमचा ‘अटॅक’ हा चित्रपट 1 एप्रिल 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. जॉन अब्राहमच्या या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जॅकलीन फर्नांडिस आणि रकुल प्रीत सिंग देखील आहेत.

आरआरआर

आरआरआर
दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अनेकवेळा बदलण्यात आली. अखेर हा चित्रपट 25 मार्च 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात राम चरण, जूनियर एनटीआर, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्या भूमिका आहेत.

बच्चन पांडे

बच्चन पांडे
अक्षय कुमारचे दरवर्षी एक किंवा अधिक चित्रपट प्रदर्शित होतात. आता 2022 सालची होळी अक्षय कुमारने बुक केली आहे. त्याचा ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट 18 मार्च 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात क्रिती सेनन, जॅकलिन फर्नांडिस आणि अर्शद वारसी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

महत्वाच्या बातम्या-
सुपरहिट!झुंडने चित्रपटगृहात घातलाय धुमाकूळ, पहिल्याच दिवशी कमावले तब्बल एवढे कोटी
मृत्यूपूर्वी शेन वॉर्न ज्या बेटावर गेला होता त्याचे रहस्य काय? एकांतवासासाठी लोक जातात या ठिकाणी
करोडोंच्या संपत्तीची मालकिन आहे श्रद्धा कपूर, महिन्याची कमाई एकून तोंडात बोटं घालाल
रशियाने १५ वर्षांत सर्वोत्तम सैन्य कसं उभारलं? ज्याला घाबरून अमेरिकासुद्धा थरथर कापतीय; जाणून घ्या..

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now