Share

शिंदे सरकारमधील ‘या’ ६ मंत्र्यांनी आत्तापर्यंत बदललेत २ ते ३ वेळा पक्ष, वाचा त्यांची फिरती निष्ठा

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे गट आणि भाजपने एकत्रित येत सत्ता स्थापन केली. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार हा अजूनपर्यंत प्रलंबित होता.

नवीन सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार प्रलंबित असल्याने महिनाभरापासून विरोधक सातत्याने टीका करत होते. अखेर काल राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार झाला. तब्बल ४०दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर राज्याला किमान २० जणांचे मंत्रिमंडळ मिळाले आहे.

काल राजभवनात शपथविधी पार पडला. यामध्ये मंत्रीपदी राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकर,विजय कुमार गावित या आमदारांची देखील वर्णी लागली. यांचं वैशिष्ट्ये म्हणजे, १८ पैकी या ६ मंत्र्यांनी या पक्षातून त्या पक्षात उड्या घेत आपला राजकीय प्रवास केला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील राजकीय कारकीर्द पाहिली तर, त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस ते भाजप असा प्रवास राहिला आहे. जवळपास ६ मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी काम केलं आहे. विखे पाटील घराण्याचा मोठा सहकार आणि राजकीय वारसा आहे.

उदय सामंत यांनी २००४ मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर २०१४ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर २०१४ते २०१९ मध्येही त्यांना मंत्रिपद मिळालं. मात्र, आता त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला, इथेही त्यांना मंत्रिपद मिळालं. तर, तानाजी सावंत यांनी २०१५ मध्ये राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेत प्रवेश करताच तानाजी सावंत यांना फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले होते, मात्र त्यानंतर महाविकास आघाडीत त्यांना मंत्रिपद मिळाले नाही, याची नाराजी त्यांच्यात होती. आता शिंदे गटात त्यांना मंत्रिपद मिळालं. विजयकुमार गावित यांच्याबद्दल माहिती म्हणजे, त्यांनी २००० ते २०१४ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते.

त्यानंतर २०१४ मध्ये राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ च्या नंदुरबार विधासभा मतदारसंघातून भाजपकडून विजयी झाल्यानंतर यंदाच्या शिंदे गटातून त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दीपक केसरकर यांचाही काँग्रेस-राष्ट्रवादी- शिवसेना आणि आता फुटीर शिंदे गटात असा प्रवास झाला आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now