Share

VIDEO: जेलची हवा खाल्ली तरी थेरगाव क्वीनचा माज उतरेना, आता थेट ‘तो’ व्हिडीओ इंस्टावर केला पोस्ट

thergaon queen

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर थेरगाव क्वीन चांगलीच चर्चेत आहे. थेरगाव क्वीन असे इंस्टाग्रामवर अकाऊंट असलेल्या तरुणीचे खरे नाव साक्षी महाले असे आहे. तिने इंस्टाग्रामवर रिल्स बनवून लोकांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या.

अश्लील आणि शिवीगाळ केलेल्या व्हिडिओमुळे साक्षी चांगलीच प्रसिद्ध झाली होती. पण अशा व्हिडिओंमुळे लोकांनी तिच्या विरोधात पोलिसांनी तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या थेरगाव क्वीनला चांगलीच अद्दल घडवली आहे. तसेच तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

त्यानंतर पोलिसांनी या तरुणीला समज देऊन सोडून दिले होते. तसेच तिचा मित्र कुणाल कांबळे नावाच्या युवकाने पोलिसांसमोर माफी मागितली होती. तोही तिच्यासोबत शिवीगाळ करत व्हिडिओ बनवत होता. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही धडा शिकवत, माफी मागायला लावली. त्यानंतर त्यालाही सोडून देण्यात आले.

मात्र जेलची हवा खावून देखील ‘थेरगाव क्वीन’ची मस्ती अजून उतरलेली दिसत नाहीये. तरुणी पोलिसांच्या ताब्यातून सुटताच तिनं आणखी एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. पोलिसांनी तिला अटक केली होती त्याचा व्हिडिओ बनवून तिनं इंस्टाग्राम रीलला टाकला आहे. हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल झाला आहे.

https://www.instagram.com/reel/CZmM3Kag6LO/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, ‘थेरगाव क्वीन’ हीचे इंस्टाग्रामवर हजारो फॉलोवर्स आहेत. या तरुणींचे अनेक इंस्टाग्राम व्हिडिओ यापूर्वी देखील व्हायरल झाले होते. इंस्टाग्राम रील्समध्ये शिव्या देत असल्याने या थेरगाव क्वीनला काही जणांनी सोशल मीडियावर ट्रोल देखील केले होते. इंस्टाग्रामवर लाईक्स मिळवण्यासाठी या तरुणी अश्लील भाषेचा उपयोग करायच्या.

इंस्टाग्रामवर लाईक्स मिळवण्यासाठी नियमबाह्य वागणाऱ्या तरुणांना या कारवाईमुळे मोठी चपराक बसली आहे. यापूर्वी देखील दिल्लीतील एका महिलेने आपल्या १२ वर्षाच्या मुलासोबत अश्लील डान्स करतानाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केला होता. महिला आयोगाने या प्रकारची दखल घेत पोलिसांकडे त्या महिलेविरोधात तक्रार दाखल केली होती.

महत्त्वाच्या बातम्या
लता मंगेशकर यांचा ‘हा’ ट्विट ठरला शेवटचा; ‘या’ खास व्यक्तीसाठी केली होती शेवटची पोस्ट
‘सोमय्या जाता-जाता स्वतः पडले; त्यांनी नौटंकी करू नये’
कोरोनापासून जगाची सुटका व्हावी अशी होती लतादीदींची शेवटची इच्छा, पण त्याच कोरोनाने घेतला जीव
कहाणी गाणकोकीळेची: या कारणामुळे नाही केले लग्न, ५० वेळा पाहिला होता एकच चित्रपट

इतर क्राईम मनोरंजन

Join WhatsApp

Join Now