सध्या सोशल मीडियावर थेरगाव क्वीन चांगलीच चर्चेत आहे. थेरगाव क्वीन असे इंस्टाग्रामवर अकाऊंट असलेल्या तरुणीचे खरे नाव साक्षी महाले असे आहे. तिने इंस्टाग्रामवर रिल्स बनवून लोकांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या.
मात्र जेलची हवा खावून देखील ‘थेरगाव क्वीन’ची मस्ती अजून उतरलेली दिसत नाहीये. वाकड पोलिसांनी संबंधित मुलीला 30 जानेवारी रोजी अटक केली होती. तरुणी पोलिसांच्या ताब्यातून सुटताच तिनं आणखी एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तेव्हाचा व्हिडीओ तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊण्टवर पोस्ट केला आहे.
‘मोठी हस्ती आहे आपण, तीनपाट थोडीच आहे. ढगात आहे ना आपण, खालनं किती पण दगडं मारु द्या आपल्यापर्यंत येत नाहीत भाऊ कुणाची दगडं’… ‘अख्ख्या ब्रह्मांडाला शनि बोलून एकटा मी बास होतो, आमच्या बरोबर चालण्याचा बी त्रास होतो, नींद हराम करतो…’ असं गाणं बॅकग्राऊण्डला दिलं आहे. या व्हिडिओमधून तिने थेट पोलिसांना खुलं आव्हान दिल्याचं पाहायला मिळत आहे.
https://www.instagram.com/reel/CZmM3Kag6LO/?utm_source=ig_web_copy_link
अश्लील आणि शिवीगाळ केलेल्या व्हिडिओमुळे साक्षी चांगलीच प्रसिद्ध झाली होती. पण अशा व्हिडिओंमुळे लोकांनी तिच्या विरोधात पोलिसांनी तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या थेरगाव क्वीनला चांगलीच अद्दल घडवली आहे. तसेच तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
त्यानंतर पोलिसांनी या तरुणीला समज देऊन सोडून दिले होते. तसेच तिचा मित्र कुणाल कांबळे नावाच्या युवकाने पोलिसांसमोर माफी मागितली होती. तोही तिच्यासोबत शिवीगाळ करत व्हिडिओ बनवत होता. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही धडा शिकवत, माफी मागायला लावली. त्यानंतर त्यालाही सोडून देण्यात आले.
दरम्यान, ‘थेरगाव क्वीन’ हीचे इंस्टाग्रामवर हजारो फॉलोवर्स आहेत. या तरुणींचे अनेक इंस्टाग्राम व्हिडिओ यापूर्वी देखील व्हायरल झाले होते. इंस्टाग्राम रील्समध्ये शिव्या देत असल्याने या थेरगाव क्वीनला काही जणांनी सोशल मीडियावर ट्रोल देखील केले होते. इंस्टाग्रामवर लाईक्स मिळवण्यासाठी या तरुणी अश्लील भाषेचा उपयोग करायच्या.
इंस्टाग्रामवर लाईक्स मिळवण्यासाठी नियमबाह्य वागणाऱ्या तरुणांना या कारवाईमुळे मोठी चपराक बसली आहे. यापूर्वी देखील दिल्लीतील एका महिलेने आपल्या १२ वर्षाच्या मुलासोबत अश्लील डान्स करतानाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केला होता. महिला आयोगाने या प्रकारची दखल घेत पोलिसांकडे त्या महिलेविरोधात तक्रार दाखल केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
लतादीदींचा शेवटचा व्हिडीओ होतोय व्हायरल, त्यांची अवस्था पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा
बाप-लेकाच्या नात्याला काळीमा! वडिलांची झोपेत लाथा मारून केली हत्या, कारण वाचून हादराल
‘तुझी हिम्मत कशी झाली…’ लता मंगेशकर यांच्यासोबत अन्याय करणाऱ्यावर बाळासाहेब ओरडले तेव्हा…
बाप की राक्षस! पोटच्या मुलीवर अनेकदा केला बलात्कार, असा झाला खुलासा