..त्यामुळे १५ ऑगस्टला मिळणारी सुट्टी मोदी सरकारने केली रद्द, ‘असा’ साजरा केला जाणार स्वातंत्र्यदिवस

दरवर्षी देशभरात स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी देशातील सर्व शासकीय, खासगी कार्यालये, शाळा, महाविद्यालय यांना सुट्टी असते. मात्र, या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनादिवशी उत्तर प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनादिवशी उत्तर प्रदेश सरकारने सर्व शासकीय, खासगी कार्यालये, शाळा, महाविद्यालयांना असणारी सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश सरकारने घेतलेल्या या निर्णयाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

यावर्षी देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त केंद्र सरकारकडून देशभरात मागील वर्षभरापासून विविध उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यंदाचा स्वातंत्र्य दिन आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी अनेक राज्यांनी आत्तापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यात उत्तर प्रदेश सरकारने या दिवशी मिळणारी सुट्टी रद्द केली करण्याचा निर्णय घेतला आहे. यूपी सरकारच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केलं आहे. तर काहींनी टीका देखील केली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव दुर्गा शंकर मिश्र यांनी सांगितले की, भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी पर्व असल्याने हा स्वातंत्र्य दिन विशेष आहे. यावेळी ११ ते १५ ऑगस्ट दरम्यान स्वातंत्र्य सप्ताहाअंतर्गत प्रत्येक घरावर, आस्थापनांवर तिरंगा फडकवायचा आहे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या पध्दतीने या सप्ताहात सहभाग घ्यायचा आहे.

तसेच म्हणाले, भविष्यात असा योग २५ वर्षानंतरच येणार आहे. त्यामुळे १५ ऑगस्ट रोजीचा उत्साह संपूर्ण जगाने पाहायला हवा. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १२ जुलै रोजी त्यांच्या शासकीय निवासस्थानी अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते.