सध्या इंडियन प्रिमियर लीगचा 15 वा हंगाम सुरु आहे. या हंगामातील दुसऱ्या सामन्यातही मुंबई इंडियन्सला पराभव सहन करावा लागला आहे. त्यामुळे मुंबईचे नशीब पालटवण्यासाठी बहुचर्चित ठरलेल्या अर्जुन तेंडुलकरला केकेआरविरुद्धच्या सामन्यात पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या वर्षी अर्जूनला मुंबईने आपल्या संघात घेतले होते. मात्र त्याला एकही संधी देण्यात आली नाही. त्यामुळे यंदा त्याच्यावर संघ मोठी जबाबदारी सोपवणार आहे. आतापर्यंत दोन्ही वेळेस मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यांमध्ये मुंबईच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली असली तरी गोलंदाजांना सामना आपल्या बाजूने करता आला नाही.
यापूर्वीच्या सामन्यातच गोलंदाज बासिल थम्पीने एकाच षटकात २६ धावा दिल्या होत्या. यानंतर रोहितने त्याला पून्हा संधी दिली नाही. सध्या संघाला एका युवा गोलंदाजाची गरज आहे. त्यामुळे ते अर्जुन तेंडुलकरला घेण्याचा विचार करीत आहेत. रोहित शर्मा दरवेळी नवीन खेळाडूंना संधी देताना दिसतो. त्यामुळे यंदा तो अर्जुनला संधी देण्याच्या विचारात आहेत.
रोहितने जर अर्जुनला संधी दिली तर बासिल थम्पीच्या जागी अर्जुन संघात येऊ शकतो. मागील वर्षी रोहितने अर्जुनला खेळण्याची संधी दिली होती. मात्र दुखापत झाल्यामुळे अर्जुन संघातून बाहेर पडला. मात्र आता त्याचे पुनरागमन होणार असल्यामुळे त्याला खेळताना पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता लागली आहे. आपल्या मुलाला खेळताना पाहण्यासाठी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरही आतूर झालेला आहे.
त्यामुळे हा क्षण लवकरच त्याला बघायला भेटणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान अर्जुन तेंडुलकरने एकही सामना न खेळल्यामुळे त्याला सोशल मिडीयावर ट्रोल करण्यात आले होते. तसेच त्याच्या विषयी अनेक वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता यासंपूर्ण चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
राजामौलींच्या फीसमोर काहीच नव्हती रामचरण आणि Jr NTR ची फी, वाचा कोणाला किती कोटी मिळाले
२ बायका, ९ मुलं, १ घर, राजस्थानमधील कुख्यात देवा डॉनचा असा होता जलवा, वाचून तुम्हीही व्हायल अवाक
अल्लु अर्जूनचा चाहत्यांना धक्का, पोलिसांनी अल्लु अर्जूनला अडवून केली मोठी कारवाई
१२१ वर्षांपुर्वी ज्या KGF मध्ये ९०० टन सोनं मिळालं होतं तिची रक्तरंजित कहाणी वाचून थरकाप उडेल






