Share

‘उद्धवसाहेबांच्या जागी दुसरा कोण असता तर रक्ताचे पाट वाहिले असते’, आमदाराचे मोठे वक्तव्य

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे वादळ शिवसेना ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे निर्माण झाले. त्या वादळाला शांत करण्यात पक्ष व इतर मंडळी अपयशी ठरली. परंतु येवढ्या मोठ्या प्रमाणात शिवसेनेत घडणारे हे पहिलेच बंड म्हणता येते. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांमधील अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी एक मोठे लक्ष विधान केले आहे. (There would have been a flood of blood ‘, a big statement of the MLA)

अहमदनगरमध्ये झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात बोलताना, शिवसेना जहाल पक्ष असून बंडखोरी होताना रक्ताचे पाट वाहिले असते, असे खळबळजनक विधान अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी केले आहे.

पुढे बोलताना गडाख म्हणाले की, उद्धवसाहेब अजिबात राजकीय व्यक्ती नाहीत. शिवसेनाही जहाल संघटना आहे. बाळासाहेबांनी शिवसैनिकांमध्ये वेगळीच ताकद आणि रग निर्माण केली आहे. आज हे बंड घडून आले तेव्हा शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे.

आज राज्यात नव्हे देशात उद्धव ठाकरेंच्या जागी दुसरा नेता असता आणि त्याच्या हाती शिवसेनेसारखी जहाल संघटना असती, तर कोणी बोट दाखवेपर्यंत रक्ताचे पाट वाहिले असते. पण या माणसाने स्वतः कमीपणा घेत हे सगळं थांबवलं. त्यांनी संयमी भूमिका घेतली. पुढे काय झालं ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय, असं गडाख म्हणाले.

मंत्रीपद गेले याचं वाईट वाटत नाही. पण विकासकाम होणार नाहीत याचं वाईट वाटतं. परंतु माझ्याकडे काही कौशल्य आहेत. त्यांच्या जोरावर मी मतदार संघातील सर्व कामे करण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे.

उद्धव ठाकरे साहेबांसारख्या माणसाला अशा प्रकारे घरी जावं लागलं याचं खूप दुःख वाटतं, असंही गडाख म्हणाले. त्यांनी पुढे सांगितलं की, बंडखोरी झाल्यावर मी साहेबांना फोन केला आणि बोललो की, मी तुमच्यासोबत आहे आणि तुमच्या सोबतच राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
हा तर खऱ्या अशोकस्तभांचा अपमान, नवीन अशोकस्तंभाचे उद्घाटन करताच मोदींवर का संतापले लोक?
VIDEO: भाजप नेत्याचा बेडरूममधील व्हिडीओ महिलेने केला व्हायरल, गंभीर आरोप करत म्हणाली..
टायगर श्रॉफसोबतचे ‘ते’ फोटो व्हायरल झाल्यानंतर रश्मिका मंदानाने सोडले मौन, म्हणाली…

राजकारण ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now