employees: कोरोना काळामध्ये नागरिकांचे घराबाहेर पडणे बंद झाले. तेव्हा ‘वर्क फ्रॉम होम’ या पर्यायामुळे अनेकांच्या नोकऱ्या वाचल्या. अनेक कंपन्या कोरोनाच्या कठीण काळात सुद्धा आर्थिक नुकसानापासून बचावल्या. या सर्व गोष्टींमुळे आता वर्क फ्रॉम होमचे महत्व अधिकच वाढले आहे. मात्र भारतातील नोकरी पद्धतीत मोठा बदल होण्याचे संकेत खुद्द पंतप्रधान मोदींनी दिल्याचे समोर येत आहे.
आयटी कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून कोरोना काळामध्ये आपल्या नफ्यावर कोणताही परिणाम होऊ दिला नाही. मात्र सर्वाधिक फायद्यात असणाऱ्या काही आयटी कंपन्यांनी वर्क फ्रॉम फ्रॉमला चिकटलेल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसवर येण्याचा आदेशच दिला आहे. त्यात आता नरेंद्र मोदी यांच्या नव्या निर्णयामुळे कंपन्यांना आपल्या धोरणात बदल करावा लागणार आहे, असे दिसते.
या परिस्थितीत नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या एका सल्ल्याने देशातील नोकरी पद्धतीत बदल होण्याची चिन्हे आहेत. मागील काही दिवसांपासून एका लेबर कोडवर काम सुरू आहे. त्या लेबर कोडची अंमलबजावणी अजूनही होऊ शकलेली नाही.
लेबर कोडमध्ये विशिष्ट बदलांचे संकेत पंतप्रधानांनी दिले आहेत. आठवड्यातील ३ दिवस कर्मचाऱ्याला सुट्ट्या देण्यात याव्यात. तसेच उरलेले दिवस मात्र या कर्मचाऱ्याला १२ तास काम करावे लागणार आहे. तसेच ऑफिसला जाण्यासाठी लागणारा वेळ या सर्व गणिताचा विचार करता एकूण १५ तास त्या कर्मचाऱ्यांचे जाणार आहेत.
सुट्टी असलेल्या ३ दिवसांमध्ये तो कर्मचारी फिरण्यासाठी बाहेर पडेल. चित्रपटगृहे, पर्यटन स्थळांना भेट देईल. त्यामुळे देशाच्या पर्यटनाला चालना मिळेल. मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा सरकारला होईल, असा विचार या लेबर कोडमागे असल्याचे बोलले जाते.
३ दिवस सुट्ट्या असतील का? येत्या काळात १२-१२ तास कर्मचाऱ्यांना काम करावे लागणार का? नक्की कोणत्या प्रकारे नोकरदार वर्गाच्या कामाच्या वेळ आणि दिवस ठरतील, हे तर सरकारचे धोरण स्पष्ट झाल्यावरच समजेल. मात्र सध्या तरी या मोठ्या बदलाचे संकेत मिळत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
Actress: ‘या’ चित्रपटाने उडवून दिली होती खळबळ, अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर दिला होता बाळाला जन्म
Eknath Shinde : शिंदे सरकार अडचणीत सापडणार? माहिती अधिकारामार्फत धक्कादायक माहिती आली समोर
Sambhaji Raje : संभाजीराजे बोलूच देत नाहीत, कोणी काही बोललं की देतात ‘ही’ धमकी, मराठा क्रांती मोर्चाचा आरोप