Share

BJP : मुख्यमंत्री शिंदेंवर भाजपचा वॉच; कार्यालयात कायम असणार फडणवीसांचा ‘हा’ खास माणूस

Eknath Shinde Devendra Fadanvis

BJP : महाविकास आघाडी सरकार कोसळून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. तसेच मंत्र्यांचे खातेवाटपही झाले. मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधकांकडून प्रचंड टीकाही झाल्या.

तसेच गेल्या पाच दिवसांपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. नवे सरकार स्थापन झाल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन आहे. यात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर जोरदार वार केलेत.

त्यातच आता आशिष कुलकर्णी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात समन्वयक म्हणून काम पाहण्याची जबाबदारी दिली आहे. शिंदे – फडणवीस सरकारमध्ये भाजप आणि शिंदे गटात समन्वय राखला जावा, यासाठी आशिष कुलकर्णी यांची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

आशिष कुलकर्णी यांचा शिवसेना, काँग्रेस आणि आता भाजप असा राजकीय प्रवास आहे. विशेष म्हणजे आशिष कुलकर्णी हे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. आशिष कुलकर्णी यांच्याकडे एकनाथ शिंदेंच्या सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मुंबई या दौऱ्यात समन्वयाचे महत्वाचे असल्याचेही सांगण्यात येत आहे.

तसेच आशिष कुलकर्णी यांनी विधान परिषद व त्याआधी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत पडद्याआडून महत्वाची भूमिका पार पाडली. त्यामुळेच त्यांच्याकडे हे समन्वयाचे काम सोपविण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांमध्ये सुसंवाद राखण्याचे काम ते करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

मात्र, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या कुलकर्णी यांना समन्वयकाची जबाबदारी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री फक्त नावापुरतेच खरे सरकार भाजपचेच, अशा टीका विरोधकांकडून होत आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री कार्यालयातही भाजपने आपला माणूस नेमल्याने पुन्हा चर्चांना उधाण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या
ED : भाजप आमदाराच्या बेहीशोबी संपत्तीच्या चौकशीकडे दुर्लक्ष करणाऱ्या ईडीला कोर्टाचा दणका; केली ‘ही’ कारवाई
Vijay Deverakonda : विजय देवरकोंडाने ‘लायगर’ चित्रपटासाठी घेतले तब्बल ‘एवढे’ कोटी, मोठमोठ्या स्टार्सला टाकले मागे
Krishna Abhishek: कपिलची बाजू घेत सुनील पालने कृष्णा आभिषेकवर केली सडकून टीका, म्हणाला, शो सोडून…
Eknath Shinde : उद्धव ठाकरेंनी कंत्राटी मुख्यमंत्री हिणवताच एकनाथ शिंदे कडाडले, म्हणाले, बाळासाहेबांचे…

राज्य ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now