सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमद्धे आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. ठाकरे सरकार पडणार, असे भाकीत विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मात्र सत्ताधारी नेत्यांकडून पलटवार करण्यात येत आहे.
अशातच आता मुंबई महानगर पालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे ‘२०२४ ला महाराष्ट्रात ब्राह्मण समाजाचा मुख्यमंत्री बसावा,’ अशी इच्छा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बोलून दाखवली आहे. यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटणार असल्याच बोललं जातं आहे.
आठवले याबाबत मिरा रोड येथे बौद्ध विहार आणि विपश्यना केंद्राच्याच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पुढे बोलताना आठवले म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस जरी ब्राह्मण समाजाचे असले तरी ते बहुजन समाजाला न्याय देतात. त्यामुळे आम्हाला २०२४ ला पुन्हा मुख्यमंत्री पदी ब्राह्मण समाजाचे फडणवीस हवे आहेत.’
‘आगामी २०२४ च्या निवडणुकीत महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येणार नसून बहुमताने भाजपा व आरपीआय पक्षाचे सरकार येणार आहे. यावेळी ब्राह्मण समाजाचा मुख्यमंत्री बसावा याकरता आपले पूर्ण समर्थन असल्याचे आठवले यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सध्या अयोध्या दौरा चांगलाच चर्चेत आहे. याचे कारण असे की, राज यांच्या दौऱ्याला होणारा वाढता विरोध. येत्या ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी जाहीर केले. त्यानंतर राजकारण चांगलेच तापलेलं पाहायला मिळत आहे.
याबाबत आठवले म्हणाले, राज ठाकरे यांनी आवर्जून अयोध्या दौरा केला पाहिजे. मात्र अयोध्या दौरा करण्यापूर्वी त्यांनी अंगावर घेतलेल्या भगव्या रंगा प्रमाणे वागावे, अशा जहरी शब्दात आठवले यांनी राज यांचे कान टोचले आहे. राज यांनी काही वर्षांपूर्वी मराठीच्या मुद्यावरून जो उत्तर भारतीयांना त्रास दिला आहे. त्यामुळे राज यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी मग अयोध्या दौरा करावा, असे आठवले म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणाऱ्या ओवैसींचं प्रसिद्ध बाॅलीवूड अभिनेत्रीने केले उघड समर्थन; म्हणाली…
भयानक स्वप्न पडायची, झोप उडालीये, चिठ्ठी लिहित चोरट्यांनी मंदिरातील कोट्यवधींच्या मूर्त्या आणून दिल्या परत
धक्कादायक! महाराष्ट्रातील काँग्रेसच्या ‘या’ जेष्ठ नेत्याचं निधन, वयाच्या ९९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मराठी अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर उतरवले अंगावरील सगळे कपडे; चित्रपटसृष्टीत खळबळ; पहा व्हिडीओ