सध्या सर्वत्र गणपती बाप्पांचे स्वागत अतिशय जल्लोषात होत आहे. अनेक कलाकारांनी आपल्या घरच्या गणपती बाप्पांसोबत फोटो काढत ते शेअर केले आहेत. त्यात कलाकार, दिग्दर्शक विजू माने यांच्या घरी देखील गणपती असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे .
या संदर्भातील माहिती विजू माने यांनी फेसबुक पोस्ट शेअर करून दिली आहे. विजू माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी खास पोस्ट टाकली आहे. लिहिले, खरंतर माझ्या घरच्या बाप्पाच्या दर्शनाला दरवर्षी शिंदे येतात. पण यावर्षी मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले होते त्यामुळे मनात कितीही वाटत असलं तरी ते येतील का याबद्दल शंका होती.
पण खरंच मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे माझ्या घरी आले. यावेळी मनमोकळ्या गप्पा मारल्या. सोबत खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आणि माजी महापौर, शिवसेना प्रवक्ते, आमचे मित्र नरेश म्हस्के हेसुद्धा दरवर्षी प्रमाणे होतेच.
खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी देखील कितीही उशीर झाला तरी माझ्या घरच्या बापाचं दर्शन घेण्याची आपली सवय मोडली नाही. ( मला चांगलं आठवतंय गेल्यावर्षी रात्री दीड वाजता खासदार माझ्या घरी आले होते. आणि तेव्हाही जवळपास अर्धा तास अत्यंत छान चर्चा झाली होती.)
प्रत्येक जवळच्या माणसाच्या, कार्यकर्त्याच्या….खरंतर आमंत्रण देणाऱ्या कुणाच्याही घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेणे ही स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांनी दिलेली शिकवण आहे. राजकारणातील उलथापालथ हा प्रत्येकाच्या चर्चेचा आवडीनिवडीचा विषय असतो. पण आपल्यासाठी तो माणूस महत्त्वाचा असतो जो आपल्या अत्यंत महत्त्वाच्या वेळेला धावून आलेला असतो.
https://www.facebook.com/1499899430/posts/pfbid0w7bggN8mDQgo14aEp9igoW4qRtvi3yqnsME6p7j54ESG9bZtKuqp4LV1v8ikWXqYl/
माझ्या बाबतीत मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचे ते स्थान आहे. आणि मी कृतज्ञता व्यक्त करण्याला कायम प्राधान्य देणारा माणूस आहे. मला शक्य तेव्हा, शक्य तिथे, शक्य त्या कार्यक्रमात मी त्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानत असतोच. या शिवाय गेली अनेक वर्ष मी त्यांना ओळखतोय.
तसेच लिहिले की, तसं पाहिलं तर आपल्याला सगळेच राजकारणी सारखेच. अनेक पक्षातल्या अनेक नेत्यांशी छान संबंध आहेत. राजकारण त्यांच्या त्यांच्या ठिकाणी असावं पण सन्मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब ह्या माणसात अशी काहीतरी जादू आहे की त्यांच्यासाठी आपण ‘काहीही’ करू शकतो.’ अशी पोस्ट माने यांनी लिहिली आहे.