छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन सोशल मिडीयावर चर्चेत असते. तेजश्रीने आपल्या अभिनयाची कमाल दाखवत एक मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. तीने केलेल्या प्रत्येक एका पोस्टवर चाहते बारीक नजर ठेवून असतात. तीच्या पोस्ट सुध्दा नेहमी चर्चेचा विषय ठरतात. आता देखील वुमन्स डे निमित्त तेजश्रीने केलेली एक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.
तेजश्रीने आपल्या इंटाग्राम अंकाऊटवर 8 मार्च रोजी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला हटके कॅप्शन देत तीने म्हटले आहे की, “माझ्या कोणत्याही निर्णयावर मी खंत व्यक्त करत बसत नाही किंवा माझ्यासोबत कोणालाही काही वाईट करू देत नाही.
जर मी पडले तर मी त्यातून सावरेन आणि खंबीरपणे उभी राहीन याची मला खात्री आहे. माझ्या आयुष्यावर माझा पूर्ण ताबा आहे आणि मी साध्य करू शकत नाही अशी कोणतीच गोष्ट या जगात नाही.” तसेच, मला चुकीच्या वागणूक देणाऱ्यांना मी सोडत नाही असे देखील तेजश्रीने म्हटले आहे. तीने लिहलेल्या या पोस्टवर भरभरुन कमेंट्स मिळाल्या आहेत.
https://www.instagram.com/accounts/login/?next=/p/Ca1cKNzJEGY/
तेजश्री नेहमीच अशा बेधडक पोस्ट करत असते. कोणतीही गोष्ट मनात न ठेवता ती स्पष्ट मांडणे तेजश्रीला आवडते. 8 मार्च रोजी वुमन्स डे सर्वत्र साजरी करण्यात आला. यावेळी अनेक कलाकार सोशल मिडीयावर व्यक्त होताना दिसले. यात तेजश्रीचा सुध्दा सहभाग होता.
आपल्या मनमोहक सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधानला ओळखले जाते. परंतु एक स्वतंत्र स्त्री, स्पष्ट बोलणारी कलाकार आणि एक निरागस मुलगी म्हणून सुध्दा तेजश्रीची ओळख आहे. तेजश्रीने आतापर्यंत नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये काम केले आहे.
तेजश्रीचा हा सर्व प्रवास सुरु असताना तीच्या भुतकाळाविषयी नेटकरी ट्रोल करताना दिसतात. परंतु त्यांना सुध्दा ती सडेतोडपणे उत्तर देत असते. कित्येक मुलाखतीत तीने आता माझ्यावर भुतकाळाचा परिणाम होत, मी नवीन आयुष्याला सुरुवात केली असल्याचे सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
VIDEO: खेसारीलालचं ‘छू के छोड देला’ गाणं रिलीज, बेडरूममध्ये रोमांस करताना दिसले खेसारी-रक्षा
दाऊदने फोन केला म्हणूनच मलिकांचा राजीनामा घेतला जात नाहीये; चंद्रकांत पाटलांच्या आरोपाने उडाली खळबळ
काँग्रेसला मोठा धक्का! तीन वेळा मुख्यमंत्री झालेल्या नेत्याने सोडला पक्ष; सोनीयांना पत्र लिहीत म्हणाला…
‘या’ फोटोत किती प्राणी लपले आहेत? शोधता शोधता होईल डोक्याचा भुगा, ९९% लोकं फेल