चीनमध्ये (China) कोरोना व्हायरसने (Corona Virus) पुन्हा एकदा पाय पसरायला सुरुवात केली आहे. चीनमधील अनेक शहरांमध्ये कोविड-19 संसर्गाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. रविवारी, 13 मार्च रोजी सलग दुसऱ्या दिवशी तीन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. हाती आलेल्या रिपोर्टनुसार रविवारी चीनच्या 19 प्रांतांमध्ये कोरोनाचे सुमारे 3400 नवीन रुग्ण आढळून आले. त्यापैकी 1807 रुग्णांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे होती.(There has been a rapid increase in cases of Covid-19 infection)
याआधी शनिवारी, 12 मार्च रोजी, चीनमध्ये 3300 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर, तिथल्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दोन वर्षांतील सर्वात मोठी दैनिक आकडेवारी म्हणून वर्णन केले होते. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, आयोगाने सांगितले की, चीनमध्ये जवळपास दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच एकाच दिवसात कोरोना संसर्गाची इतकी प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. फेब्रुवारी 2020 नंतर संसर्गाचा हा सर्वात मोठा दैनिक आकडा आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे अनेक शहरांमध्ये पुन्हा काही निर्बंधही लादले जात आहेत. अनेक शहरांमध्ये लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोना चाचणी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार, ज्या शहरांमध्ये कोरोनाची प्रकरणे समोर येत आहेत त्यामध्ये बीजिंग, तियानजिन, शंघाई आणि चोंगकिंग या देशातील मोठ्या शहरांचा समावेश आहे.
चीनच्या सरकारी वृत्तपत्र चायना डेलीनुसार, स्थानिक प्रशासनाने शंघाईमधील शाळा-उद्याने बंद केली आहेत, तर बीजिंगमधील शाळा आणि लोकवस्तीच्या भागात बाहेरील लोकांवर बंदी घालण्यात आली आहे. बीजिंगच्या प्रशासनाने इतर भागातून येणाऱ्यांसाठीही कोविड चाचणी अनिवार्य केली आहे. याच कारण हेच की कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागला आहे.
स्थानिक वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, रविवारी भारतात कोरोनाचे 4,194 नवीन रुग्ण आढळले. भारताच्या या आकडेवारीसमोर चीनमध्ये एका दिवसात समोर आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या खूपच कमी आहे. रविवारी राजधानी बीजिंगमध्ये केवळ 20 प्रकरणे नोंदवली गेली, परंतु तरीही सरकारने निर्बंध लादण्यास सुरुवात केली. अनेक शहरांमध्ये संपूर्ण लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, चीन सरकार हे करत आहे कारण ते कोरोनावरील ‘झिरो-कोविड पॉलिसी’चे पालन करत आहे. याअंतर्गत कोरोनाचे रुग्ण शून्य होईपर्यंत कडक कारवाई करावी लागणार आहे.
चीनमधील ज्या शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे, त्यात उत्तर-पूर्व राज्यातील जिलिन शहराचा समावेश आहे. येथे शनिवारी, 12 मार्च रोजी लॉकडाऊन लागू झाल्यानंतर शेजारील राज्यांसह सीमा सील करण्यात आली आहे. जिलिनला लागून असलेल्या यांजी राज्याची सीमा उत्तर कोरियाला लागून आहे. येथे सात लाख लोक राहतात. त्यामुळे ही सीमा अत्यंत कडकपणे सील करण्यात आली आहे. रविवारपर्यंत जिलिन शहरात 1412 संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर रविवारपर्यंत संपूर्ण जिलिन राज्यात एकूण 2052 कोरोना रुग्ण आढळले आहेत.
याशिवाय, चीनमधील टेक हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेनझेन शहरात कोरोनाचे 66 नवीन रुग्ण आढळल्यानंतर सरकारने लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. चायना डेलीच्या वृत्तानुसार, सोमवार, 14 मार्चपासून 17.5 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या शेन्झेनमध्ये पूर्ण आठवडा लॉकडाऊन असेल. शेनझेनमध्ये मेट्रो आणि बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाज घरून करण्यास सांगितले आहे.
शेन्झेनच्या प्रशासनाने मीडियाला असेही सांगितले आहे की, आता संपूर्ण शेन्झेन शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचणी केली जाईल. तसेच, गेल्या एका आठवड्यात शेनझेनहून देशाच्या इतर भागांत आलेल्या लोकांना गेल्या 24 तासांचा कोरोना चाचणी अहवाल सादर करावा लागेल. चीनच्या स्वायत्त राज्य हाँगकाँगमध्ये परिस्थिती बिकट होत चालली आहे.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, रविवारी हाँगकाँगच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोविड-19 च्या 27,647 नवीन प्रकरणांची पुष्टी केली. यादरम्यान रविवारी हाँगकाँगमध्ये कोविड-19 मुळे 87 जणांचा मृत्यू झाल्याचेही सांगण्यात आले. हाँगकाँगमध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत एकूण 3,729 लोकांनी आपला जीव गमावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
Top 5 South Gossips of the Day: २ दिवसात राधे श्यामचा तब्बल एवढ्या कोटींचा गल्ला, RRR चे महत्वाचे सीन्स लीक
१७ वर्षांत ३९९ काश्मिरी पंडित मारले पण १५००० मुस्लिम देखील मारले गेले , काँग्रेसच्या वादग्रस्त ट्विटनंतर लोक भडकले
नोकरीची चिंता सोडा, एकदाच लावा हे रोप, आयुष्यभर कमवा लाखो रुपये
विवेक अग्निहोत्रींना याचे परिणाम कोणत्या ना कोणत्या प्रकारे भोगावे लागतील, मनोज मुंतशिरचं ट्विट चर्चेत