देशामध्ये इंधन दरवाढीने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल डिझेलच्या सततच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिक त्रासले असताना एका मोठ्या उद्योगपतीने १२ रुपये प्रति लिटर पेट्रोल उपलब्ध करून देता येईल, असा दावा केला आहे. चेष्टा मस्करीत नाही, तर खरंच त्याने सरकारला एक सल्ला दिला. (..then you will get petrol for only 12 rupees per liter)
जर १२ रुपये लिटर पेट्रोल मिळेल असं म्हणलं तर लोकं बोलतील, वेड्यात काढता का राव… पण नाही ही गोष्ट खरी आहे. अनिल अग्रवाल या उद्योगपतीने हे विधान केले आहे. पण त्यासाठी सरकारला कोणत्या प्रकारची आवश्यक पाऊले उचलावी लागतील, हे सुद्धा त्यांनी सांगितले.
अनिल अग्रवाल हे ‘वेदांता’ या मोठ्या उद्योग समूहाचे प्रमुख आहेत. अनिल अग्रवाल यांच्या मते, सरकारने तेल साठे शोधण्यात आणि उत्पादन घेण्यात खाजगी क्षेत्राला सहभागी करून घेतले तर आपला भारतच स्वतः तेल उत्पादन घेऊ शकेल.
पुढे ते म्हणाले की, आपल्याला इतर देशांकडून होणाऱ्या तेल आयातीवर अवलंबून राहावे लागणार नाही. तेल आयातीवर होणाऱ्या खर्चापेक्षा स्वतः तेल उत्पादन घेतल्याने तीन चतुर्थांश इतके तेल स्वस्त पडेल. सामान्य नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळेल.
पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांबाबत लोकांचा रोष पाहून सरकारने दर कपातीचा निर्णय घेतला. त्यामुळे इंधन दरात १५ ते २५ रुपये इतकी घसरण झाली. परंतु तरीदेखील सामान्य नागरिक यामुळे समाधानी नाहीत.
आपल्याला रशिया, आखाती देश व इतर देशांकडून कच्च्या तेलाची आयात करावी लागते. आंतरराष्ट्रीय बाजारभावाने कंपन्या तेल विकत घेतात. त्यामुळे देशातील पेट्रोल डिझेलचे दर सतत कमी जास्त होत राहतात. आता अनिल अगरवाल यांनी सुचवलेला उपाय व्यवहारीदृष्ट्या कितपत योग्य आहे. तसेच सरकार या संदर्भात काय विचार करते? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
महत्वाच्या बातम्या-
‘ही’ व्यक्ती ठरवणार कोणती शिवसेना खरी अन् कोणती खोटी; उज्वल निकमांची महत्वपुर्ण माहिती
लाखो रुपये घेतले पण ‘ते’ कामच केलं नाही, अमिषा पटेलविरोधात वॉरंट जारी, होणार अटक?
शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदासाठी १०० कोटींची ऑफर, आमदार अडकला जाळ्यात; पोलिसांनी उघड केले कारस्थान