शिवसेना(Shivsena): महाराष्ट्रातील शिंदे–फडणवीस सरकार स्थापन होऊन महिना लोटल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार अखेर ९ ऑगस्टला झाला. त्यामध्ये भाजपचे ९ आणि शिंदे गटाचे ९ अशा एकूण १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अश्याप्रकारे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा पार पडला. या विस्तारादरम्यान अनेकांची नाराजी झाली. त्यात अपक्ष आमदारांचाही समावेश होता.
त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात त्या सर्वांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. २ दिवसाआधी शपथ घेतलेल्या मंत्रिमंडळातील शिंदे गटाने आज बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यावरून राष्ट्रवादीने शिंदे गटावर टीका केली आहे. शिंदे गटाने बंड करतांना राष्ट्रवादीवर आरोप केले होते.
सेनेच्या आमदारांना निधी दिला जात नव्हता तर त्या मतदारसंघातील त्यांच्या पडलेल्या उमेदवारांना पद्धतशीरपणे ताकद दिली जात असल्याचा आरोप बंडखोरांनी केला होता. आता राष्ट्रवादीसुद्धा बंडखोरांच्या आरोपास प्रत्युत्तर देत आहे. याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. यावर शिंदे गटाची प्रतिक्रिया येण्याची प्रतीक्षा आहे.
“ईडी सरकारमधील मंत्र्यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. हे दर्शन आस्थेपोटी घेतले असते तर त्यांनी शिवसेना फोडली नसती”, शिवसेनेत बंड करायचे आणि आस्था आमची बाळासाहेबांशी आहे हे दाखवायचं यामध्ये आस्था किती? आणि लालसा किती? हे राज्यातील जनतेला कळून चुकलं आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी शिंदे गटावर टीका केली.
महेश तपासे पुढे म्हणाले कि, “भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळापासून काही अंतरावर आहे. परंतु ज्या लोकांकडून भारतीय राज्यघटनेची पायमल्ली केली गेली आहे त्यांच्याकडून स्मारकाचे दर्शन घेतले जाईल का? हा विचार करणंच चुकीचं आहे. ज्यांना घटनाच मान्य नाही ते डॉ. बाबासाहेबांचा काय आदर करणार आहेत?”,असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
“ईडी सरकारमधील मंत्र्यांनी शपथ घेतली पण कोणत्या मंत्र्यांकडे कोणती खाती असणार आहे हे अजूनही समजून आलेले नाही. शिंदे गटावर भाजपचा दबाव असल्याने शिंदे गटाला दुय्यम दर्जाची खाती देऊन भाजप आपल्याकडे वजनदार खाती ठेवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे गटात सध्या चढाओढ सुरू असून एकवाक्यता नसल्याने हे सरकार अधिवेशनाला कसे सामोरे जाणार हा खरा प्रश्न आहे”, या शब्दात त्यांनी टीका केली.
महत्वाच्या बातम्या
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, तर आशिष शेलारांनाही मिळाली मोठी जबाबदारी
ACB: नटून थटून आली अन् जाळ्यात अडकली, कोल्हापूरात महिला अधिकाऱ्याला लाच घेताना अटक
Pankaja Munde : मंंत्रिमंंडळात स्थान न मिळाल्यामुळे पंकजा मुंडे यांनी उघडपणे नाराजी केली व्यक्त; म्हणाल्या, मी पात्र…
Pankaja Munde : मंंत्रिमंंडळात स्थान न मिळाल्यामुळे पंकजा मुंडे यांनी उघडपणे नाराजी केली व्यक्त; म्हणाल्या, मी पात्र…