uddhav thackeray : ‘…मग तुम्हाला दाखवतो शिवसेना काय आहे ते,’ उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना फोडला घाम

uddhav thackeray : शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून मागच्या सरकारवर म्हणजेच ठाकरे सरकार अनेक आरोप होतं आहेत. सत्ताधाऱ्यांनी अक्षरक्षा विरोधकांना सळू की पळू केलं आहे. आता याच वादात अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उडी घेतली आहे. सर्वांनी एकत्र या, मग तुम्हाला दाखवतो शिवसेना काय आहे, असं आव्हान थेट ठाकरेंनी दिलं आहे.

काल उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनमध्ये आयोजित विभागप्रमुख व उपविभाग प्रमुखांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ठाकरे यांनी अनेक राजकीय घडामोडींवर सविस्तर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी थेट सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने शिवसेनेला लक्ष केलं जातं आहे. शिवसेनेला लागलेल्या गळतीबाबत भाजपकडून टीका करण्यात येतं आहे. याचाच धागा पकडत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना निशाण्यावर घेतले आहे. ‘शिवसेना संपविण्याची भाषा उघडपणे केली जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मला समोरून आव्हान आले की चेव चढतो. शिवसेना संपविण्याची भाषा उघडपणे केली जात आहे आणि सगळे एकत्र होत आहेत. सगळ्यांनी एकत्र व्हावे, हीच माझी अपेक्षा होती. सर्वांनी एकत्र या, मग तुम्हाला दाखवतो शिवसेना काय आहे ते, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले.

या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी यंदाचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असल्याचं म्हटलं आहे. यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या बैठकीत उद्धव यांनी आपला शिवसेना दसरा मेळावा शिवाजी पार्कवर आयोजित करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. यासाठी तातडीने कामाला लागा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी विभाग प्रमुखांना बैठकीत दिल्या आहेत. याचबरोबर महिला आघाडी, युवासेना, शिवसैनिकांनासोबत घ्या, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले.

महत्त्वाच्या बातम्या
Chandrakant Khaire : “आम्ही क्रांती केली म्हणून खैरेंना महत्व आले, यापूर्वी त्यांना मातोश्रीवर प्रवेशही मिळत नव्हता “
Toll: बापरे! समृद्धी महामार्गावर टोल भरताना वाहनचालकांचे कंबरडे मोडणार, टोलची रक्कम ऐकून डोळे फिरतील
Shinde Group : शिंदे गटात जाताच प्रताप सरनाईकांना ईडीचा मोठा दिलासा; लवकरच केसही बंद होणार? 
बायका परपुरूषांच्या संपर्कात येतील म्हणून ‘या’ पुरग्रस्त गावातील लोक घर सोडायला नाहीत तयार