Eknath Shinde : एकेकाळी एकनाथ शिंदे हे काँग्रेससोबत जाण्यास तयार होते, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला होता. त्यांच्या या विधानाला शिवसेनेकडूनही आता दुजोरा देण्यात आला. काल शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील या गोष्टीत तथ्य असल्याचे सांगितले. आता सामनामधून देखील शिवसेनेने याबाबत भाष्य केले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असताना एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्याशी जवळीक साधली होती. सरकार स्थापनेचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शिंदेंनी गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद द्या, असे त्यावेळी काँग्रेसला सांगितले होते. या गोष्टीचे साक्षीदार असणारी अनेक माणसे आजही त्यांच्या आसपास आहेत.
एकनाथ शिंदे तेव्हा काहीतरी वेगळं करण्याच्या तयारीत होते, मात्र सौदा फिसकटला इतकचं. २०१४ मध्ये नव्या सरकार स्थापनेचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेचे शिष्टमंडळ काँग्रेसला भेटले होते. त्यामध्ये एकनाथ शिंदे होते. म्हणजेच काँग्रेससोबत जाण्याला तेव्हा शिंदेंनी विरोध केला नव्हता. ठाकरे- दिघे यांच्या हिंदुत्ववादी विचारांना तडा जाईल, असे तेव्हा त्यांना वाटले नव्हते.
पंधरा-सोळा आमदार घेऊन येतो. गृहमंत्रीपद द्या, उपमुख्यमंत्री पद द्या, अशी मागणी त्यांनी त्यावेळी काँग्रेसकडे केली होती. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी लोक आहेत. शिंदे काँग्रेससोबत जाण्याच्या तयारीत आहेत. हे तेव्हा भाजपमधील लोकांनीच उद्धव ठाकरेंच्या कानावर घातले होते.
शिंदे ईडीच्या भीतीमुळे हे सगळं करत आहेत. ठाणे महानगरपालिका, समृद्धी महामार्ग, आणि नगरविकास खाते म्हणजे पैसाच पैसा.. त्यामधून सत्ता येणार, मग सत्तेमधून अजून पैसा.. अशा सगळ्या चक्रात शिंदे अडकले आहेत. नाहीतर शिंदे माणूस कामाचा होता, असे अनेक जण बोलतात, अशीच टीका शिवसेनेने शिंदेंवर केली आहे.
मुख्यमंत्री बनण्याची महत्वकांक्षा असणं आणि लालसा असणं यात फरक आहे. शिंदे लालसेचे बळी ठरले. त्यामुळेच ते या सगळ्यात अडकले. ते सत्तेसाठी किती उतावीळ झाले होते, याबद्दल अशोक चव्हाण यांनी देखील सांगितले आहे, अशाप्रकारे शिवसेनेने शिंदेंवर खरमरीत टीका केली. याबाबत आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या-
shivsena : ..तेव्हा एकनाथ शिंदेंनीच आनंद दिघेंच्या पाठीत खंजीर खुपसला; शिवसेनेचा गौप्यस्फोट
Snake : धामण समजून मण्यार सापाशी खेळणं बेतलं जीवावर; सर्प मित्राचा झाला दुर्दैवी मृत्यू
Shivsena : ‘ उद्धव ठाकरेंना १९९६ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यांनी आम्हाला खोटं बोलायला भाग पाडलं’