रशिया आणि युक्रेनमधील वादाचे पडसाद हे इतर देशांवर पडण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान भारताने युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना भारतात आणण्यात यश आले. 250 भारतीयांना घेऊन येणारे विमान रविवारी पहाटे दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) उतरले.
‘ऑपरेशन गंगा’ असे या मोहिमेला मोदी सरकारने असे नाव दिले आहे. सोशल मीडियावर या योजनेतून परत आलेल्या विद्यार्थ्यांचे, नागरिकांची माहिती देत मोदी सरकारचं कौतूक करण्यात येत आहे. आतापर्यंत एअर इंडियाच्या विमानातून शेकडो विद्यार्थी आणि नागरिक मायदेशात परतले आहेत.
मात्र, यावरुन आता राजकारण तापलं आहे. ‘हजारो भारतीय अडकलेले असताना १५० जण मायदेशात परतल्यावर त्याची जाहिरात सुरू आहे,’ या शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊतांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. याबाबत ते माध्यमांशी बोलत होते.
तसेच आतापर्यंत जगात अनेक युद्ध झाली. पण अशाप्रकारे एखाद्या देशात भारतीय विद्यार्थ्यांवर अत्याचार झाले नव्हते. मोदी सरकारचे हे अपयश असल्याचे राऊत म्हणाले. याचबरोबर बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा हिने ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे.
ट्विट करताना ती म्हणतीये, ‘मोदी सरकारने 219 विद्यार्थ्यांना देशात आणले पण त्याचं ते भांडवल करत आहेत. जाहिरातबाजी करत आहे, युपीच्या निवडणुकांसाठी याचा प्रचार करत आहेत, असे या इमेजमध्ये रिचाने म्हटले आहे. सध्या राजकीय वर्तुळात रिचाचे हे ट्विट मोठ्या प्रमाणत व्हायरल होतं आहे.
पुढे बोलताना रिचा म्हणतीये, ‘मनमोहनसिंग सरकारच्या काळातही अशाप्रकारे 16 हजार भारतीय नागरिकांना लीबियातून मायदेशी आणण्यात आल्याचे सांगितले. मात्र, मनमोहनसिंग सरकारने अशी जाहिरातबाजी किंवा गवगवा केला नाही, असे म्हणत तिने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
सत्तेचा माज! ‘पुण्यात शिकायचं असेल तर पैसे दे’, राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्यानं उकळली 10 लाखांची खंडणी
आता मुंबईत कोणीच राहणार नाही उपाशी; दररोज २५ हजार गरजू लोकांना मिळणार मोफत जेवण; वाचा सविस्तर
मार्च महिन्यात मारुती करणार मोठा धमाका! लाँच करणार दोन नवीन कार, 7 सीटसह मिळणार 32Kmpl चे उत्तम मायलेज
मॅच जिंकूनही रोहितच्या रागाच्या तडाख्यात सापडला ‘हा’ खेळाडू; भर मैदानावरच खाल्ला ओरडा