Share

shivsena : ..तेव्हा एकनाथ शिंदेंनीच आनंद दिघेंच्या पाठीत खंजीर खुपसला; शिवसेनेचा गौप्यस्फोट

dighe and shinde

shivsena  : महाराष्ट्राचा राजकारणात एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यामुळे मोठा भूकंप झाला. शिवसेनेमध्ये उभी फूट पडली. बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांचे आम्ही वारसदार आहोत, असे म्हणत एकनाथ शिंदे गट बाजूला झाला. या गटाने भाजपची युती करत नवे सरकार स्थापन केले. आता शिंदे गट आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेत आपणच खरी शिवसेना आहोत, असा दावा करत आहे.

एकनाथ शिंदे यांनी जरी म्हटले आम्हीच शिवसेना आहोत. तरी त्याला शिवसेनेने सडेतोड उत्तर दिले आहे. शिवसेनेकडून म्हटले गेले की, सगळेच आनंद दिघे नसतात. काहीजण शिंदे असतात, असे म्हणत धर्मवीर सिनेमाचा किस्सा सांगत सामनातून एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप करण्यात आला. त्यांनी आनंद दिघेंच्या पाठीत खंजीर खुपसला, असे शिवसेनेने म्हटले आहे.

शिवतीर्थावरचा दसरा मेळावा खरा दसरा मेळावा. हे सर्व देश जाणतो. मात्र शिंदे गट आपलीच खरी शिवसेना मानून दुसरा दसरा मेळावा घेत आहे. या क्षणी दिल्ली आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. पुन्हा आनंद दिघे यांचा नावाने हे खेळ सुरू आहेत.

राजकारणात सगळ्यांना दिघे होता येत नाही. काहीजण ‘शिंदे’ पण होतात.. आनंद दिघे नक्की कोण होते? यावरच प्रकाशझोत टाकणारे रोखठोक, असे म्हणत शिवसेनेने सामनाच्या रोखठोकमधून शिंदे गटावर जळजळीत टीका केली. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात उभी फूट पाडण्यासाठी स्वर्गीय.आनंद दिघे यांच्या नावाचा आधार घेतला, असा आरोपही यातून करण्यात आला.

२१ वर्षानंतर आनंद दिघे यांची आठवण शिंदेंना झाली. काही कोटी खर्च करून त्यांच्यावर ‘धर्मवीर’ सिनेमा काढण्यात आला. मात्र सिनेमासाठी झालेल्या खर्चापेक्षा शिंदेंनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठीच अधिक खर्च केला. या हा सिनेमा चित्रपटगृहात येत असतानाच शिंदेंनी शिवसेनेत बंड घडवून आणत स्वतःची मोठी प्रसिद्धी मिळवली,असे शिवसेनेचे म्हणणे आहे.

आता मात्र आनंद दिघे भाजपप्रेमी किती होते आणि काँग्रेसद्वेष किती करायचे. हे सांगण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे, असा आरोपही शिवसेनेने शिंदे गटावर केला. तसेच आजवर नारायण राणे, छगन भुजबळ यांनी पक्ष सोडला. मात्र पक्षावर दावा केला नाही. एकनाथ शिंदे यांनीही पक्षविरोधी भूमिका घेतली. मात्र ते पक्षावरच आता दावा सांगत आहेत. हे शिंदेंचं नव्हे तर भाजपचे डोकं आहे, असा आरोप शिवसेनेने केला.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now