Share

…तर मग धवनही भारतीय संघात स्थान मिळवण्यास पात्र आहे, निवड समितीवर रैना संतापला

आयपीएल २०२२ नंतर लगेच भारत विरूध्द दक्षिण आफ्रिका यांच्यात ५ सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. या मालिकेसाठी १८ सदस्यांची टीम इंडियात निवड करण्यात आली आहे. या टीममध्ये अनेकांनी पुनरागमन केलं असून यामध्ये  दिनेश कार्तिकचा देखील समावेश करण्यात आला आहे.

आयपीएलच्या दमदार कामगिरीच्या जोरावर कार्तिकने ३ वर्षांनी टीम इंडियात जागा मिळाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघावर सुरेश रैनाने नाराजी व्यक्त केली. या भारतीय संघात शिखर धवनचा समावेश करण्यात न आल्याने रैना नाराज झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी शिखर धवनला भारतीय संघात संधी मिळालेली नाही. धवनने २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. शिखर धवनने  गेल्या ३-४ वर्षांपासून सातत्याने धावा केल्या आहेत.

रैनाने विश्वास व्यक्त केला आहे की, दिनेश कार्तिकने वयाच्या ३७ व्या वर्षी भारतीय संघात स्थान मिळवले आहे तर,  शिखर धवनही भारतीय संघात स्थान मिळवण्यास पात्र आहे. धवनने एका मुलाखती मध्ये सांगितले आहे की, त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किमान तीन ते चार वर्षे शिल्लक आहेत.

रैनाने स्टार स्पोर्ट्सला सांगितले आहे की, ‘साहजिकच शिखर निराश झाला असावा. प्रत्येक कर्णधाराला संघात आपल्यासारखा खेळाडू हवा असतो. तो एक मजेदार माणूस आहे जो देशांतर्गत, टी२० किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो, तो चांगला खेळतो आणि नेहमी धावा करतो.

शिखर धवन हा आयपीएल २०२२ च्या लिलावात खरेदी केलेला पहिला खेळाडू होता. मेगा लिलावात धवनला पंजाब किंग्जने ८.२५ कोटी रूपयांना खरेदी केले होते. आयपीएलच्या मागील तीन हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. धवन आयपीएल २०२२ मध्ये त्याने १४ सामन्यांमध्ये ३८.३३ च्या सरासरीने ४६० धावा केल्या.

महत्वांच्या बातम्या:-
अरे वा! आता whats app वरून डाऊनलोड करता येणार पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स आणि बरंच काही..
बापाच्या अपमानाचा बदला पोरांनी घेतला; एकाने IPL गाजवली तर दुसऱ्याने तेंडूलकरला घरी बसवले
राणी व्हिक्टोरियासोबत ‘या’ भारतीयाचं होतं अफेअर, राजघराण्याला कळताच उडाली होती खळबळ

 

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now