एलियनच्या प्रेमात वेडी झाली तरूणी; म्हणाली, ‘परग्रहावरून प्रायवेट फोटो पाठवतो’, लव्हस्टोरी वाचून अवाक व्हाल

अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेने आपण एलियनला भेटलो असल्याचा विचित्र दावा केला आहे. तीने केलेल्या या दाव्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. या महिलेने म्हटले आहे की, एलियन्स तिला त्यांची वैयक्तिक छायाचित्रे पाठवतो. हा एलियन्स हॉलिवूडच्या अवतार या चित्रपटात दिसलेल्या जीवांसारखाच दिसतो.

हे सर्व दावे करणारी महिला अमेरिकेच्या मिसुरी राज्यात राहणारी 29 वर्षीय लिली नोव्हा आहे. लिलीने सांगितले आहे की, सर्वात प्रथम मी एलियनला लॉकडाउनमध्ये भेटली. ज्यावेळी मी अंगणात रात्रीची फेरे मारण्यासाठी गेले होते. मला अचानक दिसले की, अंगणात काही तरी तेजस्वी प्रकाश पडला आहे.

सुरुवातीला काय आहे हे मला समजले नाही. परंतु नंतर नीट पाहिल्यावर मला तिथे एलियन दिसला. एलियन माझ्या मनातील भिती घालवण्यासाठी रोज मला फोटो पाठवतो. यानंतर लिलीने आणखीन विचित्र दावे केले आहेत. तीने म्हटले आहे, आता मी एलियनच्या प्रेमात पडली आहे.

आम्ही आता सारखे एकमेकांना भेटतो. या एलियनमुळे मला इतर ग्रहांवर राहणारे अनेक प्रकारचे प्राणी देखील भेटले आहेत. मुख्य म्हणजे एलियन कसा दिसतो याची माहिती लिलीने सर्वांना दिली आहे. लिलीने केलेल्या वर्णनानुसार, एलियनचे डोळे निळ्या रंगाचे आहेत. या एलियनला डोक्यावर एकही केस नाही.

लिलीला भेटलेला एलियन सर्वांत सुंदर दिसतो. इतर एलियन देखील त्याच्याच सारखी दिसतात. लिलीने सांगितले आहे की, या एलियनने माझ्या मनातील भिती घालवण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. आता मला त्यांची भिती वाटत नाही. आम्ही आता व्यवस्थित बोलतो.

लिलीने केलेले दावे अनेकांनी फेटाळून लावले आहेत. परंतु लिली आपल्या दाव्यांवर ठाम आहे. आपण काही खोटे बोलत नसल्याचे लिलीचे म्हणणे आहे. तीच्या या दाव्याला खरे मानत अनेकांनी एलियनचा तपास सुरु केला आहे. मात्र अद्याप कोणी ही पुरावा देऊन एलियन असल्याचे सिध्द केलेले नाही.

महत्वाच्या बातम्या
युपीत ६० जागा लढवणाऱ्या शिवसेनेला किती मते मिळाली? वाचून बसेल धक्का
सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होत योगी आदित्यनाथ ३७ वर्षांनंतर रचणार नवा इतिहास
काॅंग्रेसच्या पराभवानंतर प्रियांका गांधींनी दिला कार्यकर्त्यांना धीर; म्हणाल्या, निराश होण्याचे कारण नाही..