प्रेम हे आंधळं असतं असं म्हणतात. कोणाच्या प्रेमात कधी आणि कोणत्या मार्गांने पडेल सांगता येत नाही. प्रेमासंदर्भात आता एक अशी विचित्र घटना घडली आहे, जी वाचून तुम्हाला देखील धक्का बसेल. ही घटना अमेरिकेतील ओहायो येथे घडली आहे .
अमेरिकेतील ५१ वर्षांच्या व्यक्तीनं चक्क त्याच्या मुलाच्या एक्स गर्लफ्रेंडशी लग्न केलं आहे. प्रेमात पडणारी तरुणी या व्यक्तीपेक्षा २४ वर्षांनी लहान आहे. एका तरुण मुलीने एवढ्या वयाच्या पुरुषाशी लग्न केलं हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. पण म्हणतात ना प्रेम करण्यासाठी वयाची मर्यादा नसते.
आपल्याच एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांच्या प्रेमात पडणाऱ्या या तरुणीचं वय जेमतेम २७ वर्षे आहे. तरुणीचं नाव सिडनी असून, तिने लग्न केलेल्या या पुरुषाचं नाव पॉल आहे. पॉल हा एक ट्रक ड्रायव्हर आहे. जेव्हा सिडनी फक्त ११ वर्षांची होती आणि पॉलच्या मुलाला डेट करत होती.
मात्र, आपला बॉयफ्रेंड म्हणजेच पॉलचा मुलगा हा दुसऱ्या कोणा मुलीसोबत डेट करत आहे, हे तिला समजलं. आपला बॉयफ्रेंड धोका देत असल्यानं तिनं त्याच्यापासून लांब राहण्यास सुरुवात केली. या दरम्यान, तिने बॉयफ्रेंडच्या वडिलांशी फोन वरती यासंदर्भात चॅटिंग करण्यास सुरुवात केली.
बॉयफ्रेंडचे वडील पॉल आणि सिडनी मध्ये एवढं चॅटिंग वाढलं की पॉलच्या मुलाचा विषय बाजूला राहून सिडनी आणि त्याच्यात एकमेकांबद्दल प्रेम वाढू लागलं. सिडनी पॉलच्या प्रेमात पडली. त्यानंतर त्यांनी लग्न केलं. आपण एकेकाळी ज्याला डेट केलं. त्याच बॉयफ्रेंडच्या वडिलांसोबत आज लग्न केलं यावर सिडनीला देखील विश्वास बसत नाही.
आपल्याच बॉयफ्रेंडची आपण सावत्र आई होऊ असा विचार सिडनीने स्वप्नात देखील केला नव्हता. सिडनीला याबद्दल विचारले असता म्हणाली, मी कधी पॉलच्या प्रेमात पडेल असं मला वाटलं नव्हतं. आम्ही अगदी वेगळ्याच पद्धतीने भेटलो. पण मी पॉलशी लग्न केलं याचा मला खूप आनंद आहे.